Maharashtra Elections 2024 : राज्यात बंडखोर टेन्शन वाढवणार! महायुती-मविआचे 150 बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात

Last Updated:

Maharashtra Assembly Elections : शेवटच्या क्षणी काही उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. त्याशिवाय, इच्छुक नाराज उमेदवारांनीदेखील बंड करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राज्यातील प्रमुख दोन आघाडींसाठी ही बंडखोरी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

nearly  to 150 rebels in Maharashtra  Assembly Elections challenge to MahaVikasAghadi and Mahayuti
nearly to 150 rebels in Maharashtra Assembly Elections challenge to MahaVikasAghadi and Mahayuti
मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपांचा तिढा कायम असताना दुसरीकडे या दोन्ही आघाड्यांमध्ये तिढा निर्माण झाल्याचे दिसून येते. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांचेही जवळपास 150 बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या लढतीचे अंतिम चित्र हे 4 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल.
विधानसभा निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी 29 ऑक्टोबरही मुदत होती. ही मुदत संपेपर्यंत नाट्यमय घडामोडी घडल्या. काही ठिकाणी आपल्या मित्रपक्षाच्या उमेदवाराविरोधात उमेदवार उतरवण्यात आला. शेवटच्या क्षणी काही उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. त्याशिवाय, इच्छुक नाराज उमेदवारांनीदेखील बंड करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

 बंडखोर वाढवणार टेन्शन...

राज्यातील प्रमुख दोन आघाडींसाठी ही बंडखोरी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये जवळपास 80 ठिकाणी बंडखोर उभे करण्यात आल्याचे चित्र आहे. निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीची शेवटची तारीख ही 4 नोव्हेंबर आहे. या दरम्यानच्या कालावधीत बंडोंबांना थंड करण्याचे जोरदार प्रयत्न होणार आहेत. युती-आघाड्यांमध्येही याच कालावधीत चर्चेची दुसरी फेरी होण्याची शक्यता असून काही ठिकाणचे उमेदवार मागे घेतले जाण्याची शक्यता आहे.
advertisement

महायुती, महाविकास आघाडीकडून किती उमेदवार?

निवडणूक अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे 103, शिवसेना ठाकरे गट 96, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून 87 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. महाविकास आघाडीने आपल्या मित्रपक्षांना हाताच्या बोटावर मोजण्या इतपत जागा सोडल्या. त्यामुळे मविआवर मित्रपक्ष नाराज आहेत. तर महायुतीकडून 286 जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये भाजप 152, शिवसेना 80 आणि राष्ट्रवादी 52 अशी उमेदवारांची संख्या आहे.
advertisement
महायुतीतील घटक पक्षांकडून काही मतदारसंघात दोन उमेदवार जाहीर केले आहेत. तर, दोन जागांवर एकही उमेदवार नाही. महायुतीने 286 जागांवर 289 उमेदवार उभे केले आहेत. तीन जागांवर महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार आहे.

इतर महत्त्वाची बातमी:

advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections 2024 : राज्यात बंडखोर टेन्शन वाढवणार! महायुती-मविआचे 150 बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात
Next Article
advertisement
Raigad News: २३ वर्षांच्या पोरीने लाल बावटा फडकावला, शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक्ष
शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक
  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

View All
advertisement