Maharashtra Elections 2024 : उमेदवारी अर्ज दाखल, सरवणकर कडाडले, ''मी दबावाला घाबरत नाही, त्यांनी आता...''

Last Updated:

Maharashtra Elections Sada Sarvankar : उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सदा सरवणकर यांनी प्रतिक्रिया देताना मी कोणाच्या दबावाला घाबरत नाही, असे स्पष्ट सांगितले.

उमेदवारी दाखल केल्यावर सरवणकर कडाडले, ''मी दबावाला घाबरत नाही, त्यांनी आता...'
उमेदवारी दाखल केल्यावर सरवणकर कडाडले, ''मी दबावाला घाबरत नाही, त्यांनी आता...'
मुंबई :  संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेला हायव्होलटेज मतदारसंघ असलेला दादर-माहीम मतदासंघातून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी अखेर आज आपला निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सदा सरवणकर यांनी प्रतिक्रिया देताना मी कोणाच्या दबावाला घाबरत नाही, असे स्पष्ट सांगितले. आपल्यावर निवडणूक उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव असल्याचे सदा सरवणकर यांनी सांगितले.

चकवा देत उमेदवारी अर्ज दाखल...

दादर-माहीम मतदारसंघातून सदा सरवणकर यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना चकवा देत निवडणूक अर्ज दाखल केला. सदा सरवणकर हे मिरवणुकीने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. मात्र, मिरवणुकीत सहभागी न होता सदा सरवणकर यांनी थेट आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सदा सरवणकर यांनी म्हटले की, माझ्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव होता आणि अजूनही असल्याचे सदा सरवणकर यांनी सांगितले. मला उमेदवारी मागे घेण्यास सांगणाऱ्यांनी काहीतरी थोडा विचार करावा असे सरवणकर यांनी म्हटले. मी कोणत्याही दबावाला घाबरत नसल्याचे सरवणकर यांनी स्पष्ट केले. आपल्यावर कोणाचा दबाव आहे, याचे उत्तर देणे सदा सरवणकर यांनी टाळले.
advertisement

अमित ठाकरेंना शुभेच्छा...

सदा सरवणकर यांना अमित ठाकरे यांच्या उमेदवारीबाबत विचारले असता, त्यांनी म्हटले की, मी निवडणुकीला उभे असलेल्या प्रत्येकाला शुभेच्छा देतो. लोकशाही आहे सगळ्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. सगळ्यांनी निवडणुक लढवावी आणि लोकशाही बळकट करावी, असे सरवणकर यांनी म्हटले.

अर्ज भरण्यास घाई का केली?

सदा सरवणकर यांनी म्हटले की, अर्ज भरण्याची मुदत आज 3 वाजेपर्यंतची होती. त्यामुळे आधीच आपण निवडणूक अर्ज दाखल केला असल्याचे सरवणकरांनी स्पष्ट केले. आपल्या शिवसेना पक्षाचा एबी फॉर्म मिळाला आहे. त्याशिवाय आपण आणखी एक अर्ज भरला असल्याचेही त्यांनी सांगितले.
advertisement

अमित ठाकरे, महेश सावंत यांचे आव्हान

दादर-माहीम मतदारसंघातून सदा सरवणकर यांना मनसेचे अमित राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे विभाग प्रमुख महेश सावंत हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अमित ठाकरे यांच्यासाठी सरवणकरांनी उमेदवारी मागे घ्यावी असा सूर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि शिंदे गटाचे नेते दिपक केसरकर यांनी लावला होता. मात्र, सरवणकरांनी त्यांना सुनावत तुमच्या मतदारसंघातून मनसे उमेदवारासाठी माघार घ्यावी असा सल्ला दिला.
advertisement

इतर महत्त्वाची बातमी :

view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections 2024 : उमेदवारी अर्ज दाखल, सरवणकर कडाडले, ''मी दबावाला घाबरत नाही, त्यांनी आता...''
Next Article
advertisement
Raigad News: २३ वर्षांच्या पोरीने लाल बावटा फडकावला, शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक्ष
शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक
  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

View All
advertisement