Maharashtra Elections Sharad Pawar : भाजप कार्यकर्त्यांनो मला साथ द्या, उद्धव ठाकरेंना का करावं लागलं आवाहन?

Last Updated:

Maharashtra Elections Uddhav Thackeray Election Rally : आपल्या भाषणात उद्धव यांनी भाजप कार्यकर्त्यांना साद घालत आम्हाला साथ द्या असे आवाहनही केले.


भाजप कार्यकर्त्यांनो मला साथ द्या, उद्धव ठाकरेंना का करावं लागलं आवाहन?
भाजप कार्यकर्त्यांनो मला साथ द्या, उद्धव ठाकरेंना का करावं लागलं आवाहन?
सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर :  शिवसेनेच्या गद्दारांना 50 खोके मिळाले मग शेतकऱ्यांना हमी भाव का नाही? असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड येथील विधानसभा निवडणूक प्रचारासाठीच्या जाहीर सभेला ते संबोधित करत होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात शिंदे गटाचे विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर तोफ डागली.  आपल्या भाषणात उद्धव यांनी भाजप कार्यकर्त्यांना साद घालत आम्हाला साथ द्या असे आवाहनही केले.

मोदींच्या सभेला खुर्च्याच...पण माणसं नाहीत...

विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्याकडे आला आहे. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपाची धार आणखीच तीव्र झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या मुंबईतील सभेवरही टीका केली. उद्धव यांनी म्हटले की, काल मुंबईमध्ये खुर्चीची गर्दी झाली होती. पण माणसे आलीच नाहीत. सिल्लोडची हुकूमशाही आपण सगळेजण गाडायला आले आहात. अब्दुल सत्तार यांनी सुप्रियाताई यांना शिविगाळ केली, अपशब्द वापरले. तेच सत्तार हे मुंबईत काल मोदींच्या सभेत बसला होते. तुमची हीच संस्कृती आहे का असा सवाल यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपला केला. आमच्या हिंदुत्वाची भीती नाही म्हणून मुस्लिम महिला इथे बिनधास्त आल्याचे उद्धव यांनी सांगितले.
advertisement

भाजप कार्यकर्त्यांना आवाहन...

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात, भाजप कार्यकर्त्यांना आवाहन केले. त्यांनी म्हटले की, सिल्लोडमधील भाजपला मी आवाहन करतो. आपले मतभेद असतील ...पण तुम्ही मला बोलायला आलात तर मी तुमच्याशी बोलेन. पण अब्दुल सत्तार याची दादागिरी गुंडगिरी गाडण्यासाठी एकत्र या असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले.

शेतकऱ्यांना हमी भाव देणार...

advertisement
उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, गद्दारांना 50 खोके मिळाले मग शेतकऱ्यांना हमी भाव का नाही. आपल्या सरकारच्या काळात सोयाबीनला चांगला दर होता. आता पुन्हा आपलं सरकार आल्यावर सोयाबीनला 7000 रुपयांचा भाव देणार असल्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. शेतकरी मुले फिस भरू शकत नाही. त्यामुळे मुलीसारखे मुलांना मोफत शिक्षण देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement

सत्तारांना तुरुंगात टाकणार

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात अब्दुल सत्तार यांच्यावर असलेल्या आरोपांची यादी वाचून दाखवली. ठाकरे यांनी म्हटले की, गद्दारांनी अनेकांच्या जमिनी बळकावल्या आहेत. शहरात सुद्धा अनेक ठिकाणी मालमत्तांचा ताबा मिळवला आहे. गद्दार गद्दार एकत्र आले. त्यातील दोघांना मी मंत्रिपदे दिली. पण हे नुसते खात सुटले. आपलं महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या सगळ्या प्रकरणाची चौकशी करणार असून तुरुंगात डांबणार असल्याचे उद्धव यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections Sharad Pawar : भाजप कार्यकर्त्यांनो मला साथ द्या, उद्धव ठाकरेंना का करावं लागलं आवाहन?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement