गडचिरोली-अहेरी मतदारसंघ निवडणूक : आधीच लेकीचं आव्हान, त्यात पुतण्याने घेरलं, नात्यागोत्यातील लढाईत 'राजे' बाजी मारणार?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Assembly Elections : निवडणुकीच्या मैदानात लेकीचे आव्हान असताना पुतण्याने देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महायुतीच्या दिग्गज उमेदवाराला कडवं आव्हान निर्माण झाले आहे.
Maha we गडचिरोली : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर या निवडणुकीतील पक्षांची संख्या वाढली आहे. दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात रक्ताची नातीदेखील एकमेकांसमोर उभी ठाकली आहेत. निवडणुकीच्या मैदानात लेकीचे आव्हान असताना पुतण्याने देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महायुतीच्या दिग्गज उमेदवाराला कडवं आव्हान निर्माण झाले आहे.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांचे घड्याळ हाती घेणारे धर्मरावबाबा अत्राम यांच्यासमोर त्यांच्याच घरातील लोकांचे आव्हान उभे राहिले आहे. गडचिरोलीतील अहेरी विधानसभा मतदारसंघावर अपवाद वगळता मागील सहा दशकांरपासून अत्राम या राजघराण्याने वर्चस्व ठेवले आहे. यंदाच्या निवडणुकीत कुटुंबातील तीन सदस्यांनी एकमेकांसमोर शड्डू ठोकला आहे. त्यामुळे विजयाचा गुलाल कोण उधळणार याची चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धर्मरावबाबा यांच्याविरुद्ध त्यांची मुलगी उभी आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अत्राम यांच्या कन्या भाग्यश्री अत्राम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. वडील आणि मुलीच्या या लढाईत भाजपचे माजी राज्यमंत्री अंबरिश अत्राम यांनी बंडखोरी करत निवडणुकीच्या मैदानात एन्ट्री घेतली. तर, दुसरीकडे काँग्रेसकडून इच्छुक असलेले हनमंतु मडावी यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यामुळे चुरशीची लढत अतिशय अटीतटीच्या वळणावर आहे.
advertisement
महायुतीत भाजप तर महाविकास आघाडीत काँग्रेसने बंडखोरी केली. पण या बंडखोरीमुळे दोन्ही आघाड्यांनी एकमेकांवर कुरघोडी केली असल्याचे म्हटले जात आहे. आता या चौरंगी लढतीत कोण सरस ठरणार, मतदारराजा कोणाला कौल देणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
लोकसभेत काय झालं?
लोकसभा निवडणुकीत अहेरी मतदारसंघातून काँग्रेसला जवळपास 12 हजारांचे मताधिक्क्य मिळाले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीसमोर मोठं आव्हान आहे.
view commentsLocation :
Aheri,Gadchiroli,Maharashtra
First Published :
November 12, 2024 11:01 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गडचिरोली-अहेरी मतदारसंघ निवडणूक : आधीच लेकीचं आव्हान, त्यात पुतण्याने घेरलं, नात्यागोत्यातील लढाईत 'राजे' बाजी मारणार?


