Maharashtra Elections : विरारमध्ये गुजरात पासिंगची वाहने अडवली, बविआचा गंभीर आरोप, मध्यरात्री काय झालं?

Last Updated:

Maharashtra Elections Virar : रात्री उशिरा विरारमध्ये बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काही वाहने थांबवली. ही सगळी वाहने गुजरात पासिंगची होती.

विरारमध्ये गुजरात पासिंगची वाहने अडवली, बविआचा गंभीर आरोप, मध्यरात्री काय झालं?
विरारमध्ये गुजरात पासिंगची वाहने अडवली, बविआचा गंभीर आरोप, मध्यरात्री काय झालं?
विजय देसाई, प्रतिनिधी,  विरार :  विरारमध्ये, हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे केंद्रीय नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप करत घेरले होते. या घटनेमुळे विरारमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर मतदानाच्या एक आधी, मंगळवारी रात्री उशिरा विरारमध्ये बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काही वाहने थांबवली. ही सगळी वाहने गुजरात पासिंगची होती.
मंगळवारी,  रात्री 11-12 च्या सुमारास हे नाट्य घडलं. गुजरात पासिंगच्या 100 हून अधिक ट्रॅव्हल्स आणि इतर वाहने हे विरार शिरसाड फाट्यावर बाविआच्या कार्यकर्त्यांनी अडवल्या. वसई विरारसह मुंबई परिसरातील मतदारांना वेगवेगळे अमिष दाखवून त्यांना मतदानासाठी घेवून जात असल्याचा आरोपही बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला.
विरार शिरसाड फाटा येथे मध्यरात्री पोलीस ही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुजरात पासिंगची वाहने अडवल्यानंतर ट्रॅव्हल्सची तपासणी करण्यात आली.
advertisement

बोगस मतदानाची शंका...

गुजरातला लागून असल्याने वसई-विरारसह मुंबईतील काही नागरीक रोजगाराच्या निमित्ताने गुजरातमध्ये आहेत. हे नागरीक मतदानासाठी महाराष्ट्रात आलेत. मात्र, काही ठिकाणी बोगस मतदान होणार असल्याची शक्यता बविआच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या बोगस मतदानासाठीच गुजरातमधून बोगस मतदार आणले जात असल्याची शंका बविआच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

 संशयास्पद वाहनात काय आढळलं?

advertisement
दरम्यान, संबंधित गाड्यांमध्ये कोणतेही आक्षेपार्य साहित्य अथवा संशयास्पद आढळून आले नाही. त्यामुळे त्या गाड्या तपासणी करून सोडून देण्यात आले. ज्या चार गाड्यांची तक्रार होती त्याच्या तक्रारीवरून गाड्यांची तपासणी सुद्धा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

राज्यात आज मतदान

महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर 6 मोठे पक्ष दोन आघाड्यांचा भाग म्हणून निवडणूक लढवत आहेत. मतदानाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली.
advertisement
या मतदानासाठी ईव्हीएम यंत्रे कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवण्यात आली आहेत. या निवडणुकीत 288 मतदारसंघात एकूण 4 हजार 140 उमेदवार निवडणूक रिंगणात नशीब आजमवत आहेत. 9 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून 1 लाख 427 मतदान केंद्रावर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. 288 मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections : विरारमध्ये गुजरात पासिंगची वाहने अडवली, बविआचा गंभीर आरोप, मध्यरात्री काय झालं?
Next Article
advertisement
Ambernath Nagar Parishad Results: राडा, गोळीबाराने गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच्या मतमोजणीस सुरुवात,  निकालाचा पहिला कल काय?
राडा, गोळीबाराने गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेची मतमोजणीस सुरू, निकालाचा पहिला क
  • Ambernath Nagar Parishad Results: राडा, गोळीबाराने गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच

  • Ambernath Nagar Parishad Results: राडा, गोळीबाराने गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच

  • Ambernath Nagar Parishad Results: राडा, गोळीबाराने गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच

View All
advertisement