Maharashtra Elections : शिंदे आणि काँग्रेसला समान मते, पण शिंदेंना 57 जागा, तर काँग्रेसची दाणादाण

Last Updated:

Elections Results Eknath Shinde : निवडणुकीत शिवसेना शिंदे आणि काँग्रेस यांना जवळपास समान मते मिळाली. पण, शिंदे यांचा पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा ठरला.

शिंदे आणि काँग्रेसला समान मते, पण शिंदेंना 57 जागा, तर काँग्रेसची दाणादाण
शिंदे आणि काँग्रेसला समान मते, पण शिंदेंना 57 जागा, तर काँग्रेसची दाणादाण
मुंबई :  राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. निवडणुकीतून आलेल्या महायुतीच्या त्सुनामीमध्ये विरोधी बाकांवरील महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला. विरोधकांना विरोधी पक्ष नेतापद देखील मिळणार नाही, इतके कमी आमदार निवडून गेले आहेत. तर, दुसरीकडे निवडणूक निकालात काही रंजक गोष्टी समोर आल्या आहेत. या निवडणुकीत शिवसेना शिंदे आणि काँग्रेस यांना जवळपास समान मते मिळाली. पण, शिंदे यांचा पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा ठरला. तर काँग्रेसची धूळदाण उडाली.
भाजपला सर्वाधिक मते...
राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मतांच्या टक्केवारीत भाजप हा मोठा पक्ष ठरला. भाजपला 26.77 टक्के मते मिळाली आणि 132 जागांवर विजय मिळाला. तर, दुसऱ्याकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेला 12.38 टक्के मिळाली. एकनाथ शिंदेंच्या पारड्यात 57 जागा आल्या. तर, दुसरीकडे काँग्रेसला देखील 12.42 टक्के मते मिळाली. पण, त्यांना 16 जागांवर विजय मिळाला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेला शिंदे गटापेक्षा 2.42 टक्के मते मिळाली. उद्धव ठाकरे यांचे 20 उमेदवार विजयी झाले.
advertisement

मनसेचं काय?

राज्यात 125 जागांवर आपले उमेदवार देणाऱ्या राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही जागा मिळाली नाही. मात्र, त्यांना 1.55 टक्के मिळाली. राज्यातील निवडणुकीत 0.72 टक्के अर्थात 4 लाख 61 हजार 886 मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. ही मतांची संख्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाच्या मतदानापेक्षा अधिक आहे. प्रकाश आंबडेकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने 200 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यांना एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. समाजवादी पक्षाने दोन जागा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला एका जागेवर विजय मिळाला. समाजवादीने राज्यात 5 आणि माकपने 3 जागांवर उमेदवार उभे केले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections : शिंदे आणि काँग्रेसला समान मते, पण शिंदेंना 57 जागा, तर काँग्रेसची दाणादाण
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement