Maharashtra Winter Session: भाजपच्या गुगलीने मविआची विकेट पडणार? विरोधी पक्षनेते पदासाठी दोन सरप्राइजिंग नावं
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Maharashtra Politics : विरोधी पक्षनेते पदासाठी मविआ आक्रमक झाली असताना आता भाजप-महायुतीने गुगली टाकला आहे. भाजपच्या या गुगलीवर महाविकास आघाडीची विकेट पडणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
नागपूर: राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून विरोधी पक्षनेते पदावरून विरोधकांनी आग्रही भूमिका मांडली आहे. महाविकास आघाडीकडून विधानसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव आणि विधान परिषदेसाठी काँग्रेस सतेज पाटील यांच्या नावावर एकमत झाल्याचे दिसून आले आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी मविआ आक्रमक झाली असताना आता भाजप-महायुतीने गुगली टाकला आहे. भाजपच्या या गुगलीवर महाविकास आघाडीची विकेट पडणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी अचानक दोन सरप्राइजिंग नावं समोर आली असून मविआ कसा प्रतिसाद देणार, याकडे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
राज्यातील विरोधी पक्षनेतेपदावरून महाविकास आघाडी आणि सत्ताधारी महायुतीत नवा राजकीय पेच निर्माण झाल्याची जोरदार चर्चा नागपूरात सुरू झाली आहे. 'दैनिक लोकमत'ने दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना विधानसभा तर ठाकरे गटाचे अनिल परब यांना विधान परिषद विरोधी पक्षनेते पद दिले जाईल, अशी सहकार्याची ऑफर भाजपकडून काही मविआ नेत्यांना दिल्याची विश्वासार्ह माहिती समोर आली आहे. भाजपची ही ‘गुगली’ मविआमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न म्हणून पाहिली जात आहे.
advertisement
दुसरीकडे, मविआने अधिकृतपणे भास्कर जाधव यांना विधानसभा आणि काँग्रेसचे सतेज पाटील यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद देण्याची मागणी केली आहे. दोन्ही नावांसाठी संबंधित पक्षांनी विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांना पत्रही सादर केले आहे.
जाधवांच्या नावावर शिंदे गटाचा आक्षेप...
विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांच्या नावावर शिंदे गटाने जोरदार आक्षेप घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले. भास्कर जाधव हे विरोधी पक्षनेते झाले तर त्यांचे मुख्य टार्गेट हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांवर राहील, अशी भीती शिंदे गटातील नेत्यांना वाटत आहे. या उलट विजय वडेट्टीवार यांच्या नियुक्तीने टीकेचा फोकस महायुतीतील तिन्ही पक्षांवर विभागला जाईल, असा शिंदे गट आणि महायुतीमधील काहींचा होरा आहे. त्यामुळेच जाधव यांना विरोधी पक्षनेते पद मिळता कामा नये, असा मतप्रवाह शिंदे गटात दिसत आहे.
advertisement
या पार्श्वभूमीवर भाजपने वडेट्टीवार आणि अनिल परब यांच्या नावांवर नव्याने चर्चा सुरू केली आहे. या दोन नावांसह काही मविआ नेत्यांशी संपर्क साधल्याची माहितीही समोर आली आहे. विरोधी पक्षनेते निवडण्याचा अधिकार अध्यक्ष आणि सभापतींकडे असला तरी सत्तापक्षाचा निर्णायक प्रभाव राहतो, अशी चर्चा देखील सुरू असते.
मविआ आपल्या दोन नावावर ठाम..
दरम्यान, महाविकास आघाडी घटक पक्षांनी भाजपच्या या गुगलीवर आपली भूमिक स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडी म्हणून सतेज पाटील आणि भास्कर जाधव यांच्या नावांवर ठाम आहोत, इतर कोणतेही नाव स्वीकारायचे नसल्याचे काँग्रेसच्या एका नेत्याने म्हटले. विधान परिषदेत सतेज पाटील यांना विरोधी पक्षनेते करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचे आमदार सोमवारी सभापती प्रा. राम शिंदे यांना भेटले होते. त्यानंतर आता मंगळवारी पुन्हा भेट घेणार आहेत.
advertisement
भाजपच्या गुगलीसमोर निभाव लागणार?
विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते पदासाठी आग्रही असल्याची चर्चा होती. याआधी देखील ते विरोधी पक्षनेते होते. तर, दुसरीकडे ठाकरे गटाने विधानसभेनंतर विधान परिषदेतही विरोधी पक्षनेते पदासाठी आग्रह धरला होता, या ठिकाणी अनिल परब यांची वर्णी लावण्यासाठी प्रयत्न होते, अशी देखील राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र, काँग्रेसने संख्या बळाचा दाखला देत विधान परिषदेत सतेज पाटील यांचे नाव पुढं केलं होतं. आता, भाजपने नेमक्या याच दोन नावांना पुढं करत गुगली टाकली आहे. महाविकास आघाडीची विकेट पडणार की गुगली खेळून काढणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 09, 2025 8:15 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Winter Session: भाजपच्या गुगलीने मविआची विकेट पडणार? विरोधी पक्षनेते पदासाठी दोन सरप्राइजिंग नावं


