Maharashtra Elections 2024 : महाविकास आघाडीचा विदर्भातील तिढा सुटला, काँग्रेसला किती जागा मिळणार?

Last Updated:

Maharashtra Elections 2024 : मविआच्या जागा वाटपाच्या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यात वादावादी झाली होती.

महाविकास आघाडीचा विदर्भातील तिढा सुटला, काँग्रेसला किती जागा मिळणार?
महाविकास आघाडीचा विदर्भातील तिढा सुटला, काँग्रेसला किती जागा मिळणार?
मुंबई/नागपूर : मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुरू होता. मविआतील काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात विदर्भातील जागांवरून वाद सुरू होता. मविआच्या जागा वाटपाच्या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यात वादावादी झाली होती. त्यानंतर मविआत आलबेलं नसल्याच्या चर्चा सुरू झालेल्या. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस आणि ठाकरे गटातील जागा वाटपाचा तिढा सुटला आहे.
मतदानासाठी आता एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी असताना मविआतील शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात वाद सुरू आहे. दोन्ही पक्षांमध्ये 15 जागांवर वाद सुरू होता.  यामध्ये विदर्भातील 12 जागांवर वाद होता.
जागा वाटपाचा तिढा सुटला...
महाविकास आघाडीत विदर्भातील जागांवरून तिढा होता. विदर्भात अधिकाधिक जागांसाठी काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरू होती. आता महाविकास आघाडीत विदर्भातील जागावाटपाचा तिढा सुटला आहे. ठाकरे गटाने दावा केलेल्या विदर्भातील 12 जागांपैकी बहुतांश जागा काँग्रेसकडेच राहणार आहेत. विदर्भातील 62 जागांपैकी 40 जागांवर काँग्रेसचे उमेदवार लढणार आहेत.
advertisement
सूत्रांच्या माहितीनुसार, जागा वाटपाच्या चर्चेत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिष्ठेची केलेली दक्षिण नागपूरची जागा काँग्रेसकडेच राहणार आहे. दक्षिण नागपूर मतदारसंघातून गिरीश पांडव यांची उमेदवारी निश्चित असल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या उमेदवारांची यादी कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मध्यस्थी केल्यानंतर काल दिवसभर काँग्रेस नेत्यांच्या मुंबईत बैठका झाल्या. विदर्भातील काही जागांवर शिवसेनेचा दावा मान्य करण्यात आला. पण विदर्भातील बहुतांश जागा काँग्रेसच लढवणार असल्याची माहिती आहे.
advertisement

बाळासाहेब थोरातांवर सोपवली होती जबाबदारी...

काँग्रेसने ठाकरे गटासोबत सुरू असलेला वाद संपवण्यासाठी बाळासाहेब थोरात यांच्यावर काँग्रेस हायकमांडने चर्चेची जबाबदारी सोपवली होती. त्यानुसार, मंगळवारी, बाळासाहेब थोरात यांनी सकाली सिल्वर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. पवारांसोबत चर्चा केल्यानंतर थोरात यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections 2024 : महाविकास आघाडीचा विदर्भातील तिढा सुटला, काँग्रेसला किती जागा मिळणार?
Next Article
advertisement
Eknath Shinde Ambernath Nagar Parishad Result: अंबरनाथमध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....
शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं
  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

View All
advertisement