Maharashtra Elections : नांदगावमध्ये तुफान राडा, भुजबळ-कांदेंचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

Last Updated:

Maharashtra Elections समीर भुजबळ आणि शिंदे गटाचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला.

 नांदगावमध्ये तुफान राडा, भुजबळ-कांदेंचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले
नांदगावमध्ये तुफान राडा, भुजबळ-कांदेंचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले
नाशिक :   राज्यात उत्साहात मतदान सुरू असताना दुसरीकडे  नाशिकच्या नांदगाव मध्ये जोरदार राडा झाला. समीर भुजबळ आणि शिंदे गटाचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. मतदानासाठी आणण्यात आलेल्या मतदारांच्या मुद्यावरून दोन्ही गटात राडा झाला. या घटनेमुळे मतदारसंघात तणावाचे वातावरण आहे.
नांदगाव-मनमाड मार्गावर हा राडा झाला. नांदगावमध्ये तिहेरी लढत आहे. सुहास कांदे यांनी बोलावलेल्या मतदारांना भुजबळांनी अडवले. त्यानंतर दोन्ही बाजूंनी वादावादी झाली. या वादावादीतून दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.  यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत हाणामारी करणाऱ्यांना इतर कार्यकर्त्यांच्या मदतीने वेगळे केले. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहेत.

ऊसतोड कामगारांना डांबून ठेवल्याचा आरोप...

शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि नांदगावचे उमेदवार सुहास कांदे यांनी त्यांच्या कॉलेजवर ऊसतोड कामगारांना डांबून ठेवले असल्याचा आरोप समीर भुजबळांनी केला. भुजबळ यांनी कांदे यांच्या कॉलेजवर छापा मारला. त्यावेळी हा प्रकार समोर आला.
advertisement

राज्यात आज मतदान

महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर 6 मोठे पक्ष दोन आघाड्यांचा भाग म्हणून निवडणूक लढवत आहेत. मतदानाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.
या मतदानासाठी ईव्हीएम यंत्रे कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवण्यात आली आहेत. या निवडणुकीत 288 मतदारसंघात एकूण 4 हजार 140 उमेदवार निवडणूक रिंगणात नशीब आजमवत आहेत. 9 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून 1 लाख 427 मतदान केंद्रावर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. 288 मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections : नांदगावमध्ये तुफान राडा, भुजबळ-कांदेंचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement