Maharashtra Elections Sharad Pawar : शरद पवारांकडून निवृत्तीचे संकेत, रोहित पवारांनी सांगितला थोरल्या साहेबांच्या बोलण्याचा अर्थ

Last Updated:

Maharashtra Elections Rohit Pawar On Sharad Pawar Retirement : शरद पवारांच्या निवृत्तीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

rohit pawar on sharad pawar retirement
rohit pawar on sharad pawar retirement
नितीन नांदूरकर, प्रतिनिधी, जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीमधील विधानसभा निवडणूक प्रचार सभेत बोलताना राजकीय निवृत्तीचे संकेत दिले. त्यावरून आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सूचक वक्तव्य केले आहे. शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. पण, त्याचा अर्थ काय, हे त्यांनाच माहित असल्याचेही रोहित यांनी सांगितले.

पवारांच्या निवृत्तीबाबत रोहित काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जळगावमध्ये आले होते. जाहीर सभा संपल्यानंतर रोहीत पवार यांनी म्हटले की, शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याचा नेमका अर्थ काय निघतो हे त्यांनाच माहिती आहे. शरद पवारांनी 55 ते 60 वर्ष लोकांची सेवा केली. अशात पवारांनी एक वेगळा विचार केलेला असावा पण जोपर्यंत ते स्पष्ट बोलत नाहीत तोपर्यंत ते कळणार नसल्याचे रोहित पवार यांनी म्हटले. या वयात सुद्धा स्वतः शरद पवार हे दिवसाला तीन ते चार सभा घेत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार या राज्यात कसे येणार यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत, असे रोहित पवार यांनी म्हटले.
advertisement

तुमचे नेते मतदारसंघ सोडत नाहीत, अजित पवार गटावर टीका...

रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर टीका केली. रोहित यांनी म्हटले की, तुमचे नेते यापूर्वी महाराष्ट्रात फिरू शकत होते. पण, आता त्यांना स्वत:चा मतदारसंघ सोडवत नाही. या आधी शरद पवारांसोबत असताना तुमचे नेते यापूर्वी महाराष्ट्रात फिरत होते. प्रचारासाठी राज्य पिंजून काढत असे. आता त्यांच्याकडून आता स्वत:चा मतदारसंघ सोडवत नाही. अनिल पाटील यांचे नेते बाहेर फिरू शकत आहेत का? का ते त्यांच्या मतदारसंघात अडकून बसलेले आहेत असे टीकास्त्र रोहित पवारांनी सोडले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections Sharad Pawar : शरद पवारांकडून निवृत्तीचे संकेत, रोहित पवारांनी सांगितला थोरल्या साहेबांच्या बोलण्याचा अर्थ
Next Article
advertisement
Raigad News: २३ वर्षांच्या पोरीने लाल बावटा फडकावला, शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक्ष
शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक
  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

View All
advertisement