Maharashtra Elections 2024 : ''हे सरकार जावं, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच इच्छा'', भास्कर जाधवांनी असं का म्हटलं?

Last Updated:

Maharashtra Elections Bhaskar Jadhav On CM Eknath Shinde : शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात आरोपांच्या फैऱ्या झडत आहेत. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

''तुम्ही अजित पवारांच्या दावणीला पक्ष बांधला'', भास्कर जाधवांची CM शिंदेवर टीका
''तुम्ही अजित पवारांच्या दावणीला पक्ष बांधला'', भास्कर जाधवांची CM शिंदेवर टीका
राजेश जाधव, प्रतिनिधी,  रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपण्यासाठी काही तासांचा अवधी राहिला असताना दुसरीकडे आरोप-प्रत्यारोपांना धार आली आहे. शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात आरोपांच्या फैऱ्या झडत आहेत. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्याकडेच असून तुम्ही तुमचा पक्ष अजित पवारांच्या दावणीला बांधला असल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले. त्यांनी भाकरी फिरवा असे सांगून आपलं सरकार येता कामा नये अशीच इच्छा व्यक्त केली असल्याचा टोलाही जाधव यांनी लगावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कोकणच्या दौऱ्यात जाहीर सभांमध्ये विरोधकांवर हल्लाबोल केला. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांवरही टीका केली. ठाकरे गटाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार पलटवार केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणाचा अर्थ सांगताना भास्कर जाधव यांनी जोरदार टोलेबाजी केली.

''मुख्यमंत्रीच म्हणतात, सरकार बदला...''

advertisement
भास्कर जाधव यांनी म्हटले की, मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात दोन शब्द प्रयोग केले. त्यातील एक शब्दप्रयोग केला तो म्हणजे आडीत एक आंबा जर एक नासका निघाला आणि तो जर बाहेर काढला नाही तर संपूर्ण आडी खराब होते. जेव्हा मुख्यमंत्री यांनी हे विधान केले त्यावेळेस त्यांनी विनय नातू त्यांच्याकडे बघितलं. त्याचा अर्थ त्यांच्या महायुतीच्या पेटीतला नासका आंबा हा विनय नातू आहे हे त्याना सांगायचं होतं आणि म्हणून ह्या विनय नातू सारख्या नासके आंब्याला बाजूला करा असा त्यांनी इशारा केला.
advertisement
भास्कर जाधव यांनी म्हटले की, मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, भाकरी करपलेली आहे ती परतावी लागेल. कोणी सत्तेवर असतात त्यांना करपलेली भाकरी म्हणतात. विरोधी पक्षातल्या माणसाला कधीही करपलेली भाकरी म्हणत नाही. त्यामुळे एकनाथराव शिंदेंच्याच नेतृत्वाखाली असलेलं महायुतीच्या सरकार हे सरकार बदला, हे सरकार परतवा असं त्यांनी सांगितलं असल्याचे भास्कर जाधवांनी म्हटले. पुढे त्यांनी म्हटले की, एकनाथ शिंदेना भाजपा बरोबर जाताना खूप आनंद वाटला होता. पण जसे भाजपच्या बरोबर ते गेले तसे त्यांना कळलं की हे दुरून डोंगर साजरे आहेत. त्यामुळे, अमित शाह काय म्हणाले की भाजपाच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा सरकार आलं पाहिजे आणि ते येता कामा नये म्हणून त्यांनी हे सरकार बदला म्हणजे ही भाकरी करपली. ती परता असं त्यांनी आपल्या सरकारबद्दल केलेले विधान आहे, असे वक्तव्य करीत आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पलटवार केला
advertisement

अजित पवारांच्या दावणीला पक्ष बांधला...

भास्कर जाधव यांनी सांगितले की, मी मुख्यमंत्र्यांची ठाण्यामधील सभेत केलेली मिमिक्री ही त्यांना लागलीच बोचली आहे. भास्कर जाधव केवळ मिमिक्री करत नाही तर काम करणारा माणूस असल्याचे त्यांनी म्हटले. जाधवांनी पुढे म्हटले की, तुम्ही काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवली आणि अजित पवारांच्या दावणीला नेऊन बांधली. त्यामुळे तुम्ही सोडवलेली शिवसेना नाही, शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेच आहे. तुम्ही स्वतः जाऊन त्यांच्या दावणीला बांधला गेला त्याच आम्हाला दुःख आहे असल्याचे भास्कर जाधवांनी म्हटले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maharashtra Elections 2024 : ''हे सरकार जावं, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच इच्छा'', भास्कर जाधवांनी असं का म्हटलं?
Next Article
advertisement
BJP Shiv Sena Shinde Faction: राज्याचे लक्ष मतमोजणीकडे, इकडं चव्हाणांनी डाव साधला, एकाच वेळी शिंदे-राज ठाकरेंचा गेम
राज्याचे लक्ष मतमोजणीकडे, इकडं चव्हाणांनी डाव साधला, एकाच वेळी शिंदे-राज ठाकरेंच
  • राज्याचे लक्ष मतमोजणीकडे, इकडं चव्हाणांनी डाव साधला, एकाच वेळी शिंदे-राज ठाकरेंच

  • राज्याचे लक्ष मतमोजणीकडे, इकडं चव्हाणांनी डाव साधला, एकाच वेळी शिंदे-राज ठाकरेंच

  • राज्याचे लक्ष मतमोजणीकडे, इकडं चव्हाणांनी डाव साधला, एकाच वेळी शिंदे-राज ठाकरेंच

View All
advertisement