IAS Transferred: मंत्रिमंडळ बैठकीदिवशीच ७ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, फडणवीस यांचा निर्णय

Last Updated:

Maharashtra IAS Transfer: राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच राज्यातील सात बड्या सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत.

आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई : नाशिकमध्ये होणारा आगामी कुंभमेळा लक्षात घेता राज्य सरकारने आधीपासून तयारी सुरू केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर कुंभमेळा आयुक्तपदी शेखर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील सात ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. मंगळवारी (०७ ऑक्टोबर) सायंकाळी बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले.
राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची परंपरा या आठवड्यात देखील कायम राहिली आहे. फडणवीस यांनी राज्याचे सूत्रे हातात घेतल्यापासून विशेष करून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीदिवशी आठ-दहा अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी होतात. या आठवड्यातही सात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय मुख्यमंंत्री फडणवीस यांनी घेतला.

कोणत्या अधिकाऱ्यांच्या कुठे बदल्या?

१. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
advertisement
२. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची नियुक्ती नाशिकच्या कुंभमेळ्याच्या आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.
३. नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची नियुक्ती नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नाशिकच्या महानगर आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
४. जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नियुक्ती नाशिकच्या जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे.
५. जिल्हा परिषद ठाण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची जळगावच्या जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
advertisement
६. मुंबईच्या शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक संजय कोलते यांची नियुक्ती पुण्याचे साखर आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.
७. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबईचे सहव्यवस्थापकीय संचालक मनोज जिंदाल यांची बदली रत्नागिरीचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी दोन विशेष बदल्या

सनदी अधिकारी आयुष प्रसाद हे अतिशय उत्तम काम करणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांची बदली नाशिकच्या जिव्हाधिकारीपदी करून कुंभमेळ्याच्या नियोजनाची जबाबदारी त्यांच्यावर देण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. दुसरीकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची नियुक्ती नाशिकच्या कुंभमेळ्याच्या आयुक्त म्हणून करण्यात आली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
IAS Transferred: मंत्रिमंडळ बैठकीदिवशीच ७ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, फडणवीस यांचा निर्णय
Next Article
advertisement
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement