महाराष्ट्रात MIM ला मोठं यश, राज्यात जवळपास १०० उमेदवारांनी गुलाल उधळला, वाचा विजयी नगरसेवकांची यादी

Last Updated:

AIMIM Winning Candidate List: महापालिका निवडणुकीच्या प्रचारात एमआयएमचे सर्वेसर्वा असुदुद्दीन ओवैसी यांची अतिशय आक्रमक भाषणे आणि इम्तियाज जलील यांच्या अभ्यासू भाषणांची भुरळ मतदारांना पडल्याने राज्यात एमआयएम उमेदवारांना मोठे यश मिळाल्याचे दिसून येते.

एमआयएम विजयी नगरसेवक
एमआयएम विजयी नगरसेवक
मुंबई : राज्यात अनेक महापालिकांत एमआयएमने मुसंडी मारली आहे. 29 महापालिकांत एमआयएमचे जवळपास ९७ नगरसेवक विजयी झाली आहेत. संभाजीनगरमध्ये सर्वाधिक २४ उमेदवार विजयी झाले आहेत, त्याखालोखाल मालेगावमध्ये एमआयएमचे २० उमेदवार विजयी झाले आहेत. महापालिका निवडणूक प्रचारात पक्षप्रमुख असुदुद्दीन ओवैसी यांची अतिशय आक्रमक भाषणे आणि इम्तियाज जलील यांच्या अभ्यासू भाषणांची भुरळ संबंधित भागातील मतदारांना पडल्याने राज्यात एमआयएम उमेदवारांना मोठे यश मिळाल्याचे दिसून येते.
बृहन्‍मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५– २६ अंतर्गत दिनांक १५ जानेवारी २०२६ झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया आज शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून सुरू आहे. आतापर्यंत मराठवाड्याच्या काही भागांपुरती सीमित असणारी एमआयएम पार्टीने आता मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईतही शिरकाव केला आहे.
राज्यातील महानगरपालिका निवडणुकांमध्ये दलित-मुस्लीम मते मिळविण्याचा एमआयएमचा प्रयत्न होता. मुस्लिम बहुल भागात एमआयएमने मुस्लिम प्रवर्गातील उमेदवार उभे करून विरोधकांची डोकेदुखी वाढवली. अनेक शहरातील मुस्लिम बहुल भागांत एमआयएम पक्षाचे नगरसेवक विजयी झाले आहेत. मराठवाड्यातील संभाजीनगर, नांदेड, जालना, विदर्भातील अकोला, नागपूर, अमरावती, चंद्रपूर तर उत्तर महाराष्ट्रात मालेगाव, धुळ्यातील मुस्लिम बहुल परिसरातील मतदारांनी एमआयएमच्या उमेदवारांना साथ दिली.
advertisement

मुंबईतील एमआयएमचे विजयी नगरसेवक

प्रभाग क्रमांक १३४- मेहजबिन खान - एमआयएम
प्रभाग क्रमांक १३६- जमीर कुरेशी - एमआयएम
प्रभाग क्रमांक १३७- समीर पटेल- एमआयएम
प्रभाग क्रमांक १३८- रोशन शेख- एमआयएम
प्रभाग क्रमांक १३९- शबाना शेख- एमआयएम
प्रभाग क्रमांक १४५- खैरुनिसा हुसेन- एमआयएम

कोणत्या महापालिकेत एमआयएमचे किती नगरसेवक निवडून आले?

संभाजीनगर महापालिका- २६
advertisement
मालेगाव महापालिका- २०
सोलापूर महापालिका- ०८
धुळे महापालिका- ०८
नांदेड महापालिका- ०८
मुंबई महापालिका- ६
अमरावती महापालिका- ६
ठाणे महापालिका- ०५
नागपूर महापालिका- ०४
जालना महापालिका- ०२
चंद्रपूर महापालिका- ०१
अकोला महापालिका- ०३
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महाराष्ट्रात MIM ला मोठं यश, राज्यात जवळपास १०० उमेदवारांनी गुलाल उधळला, वाचा विजयी नगरसेवकांची यादी
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement