advertisement

आधी डॉक्टरचा छळ केला, आता SIT चा खेळ केला, महेबबू शेख यांचा गंभीर आरोप

Last Updated:

तेजस्वी सातपुते यांच्या देखरेखीखाली तपास होईल, असे पत्र काढून शब्दांचा खेळ केल्याचा आरोप मेहबूब शेख यांनी केला.

फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरण
फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरण
बीड: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पोलीस पथकाची घोषणा करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. त्यांनी आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नावाची घोषणाही केली परंतु केवळ देखरेख करण्यासाठी... डॉक्टरचा छळ केला, SIT चा खेळ केला, अशा शब्दात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते मेहबूब शेख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
डॉक्टर युवतीने आत्महत्या केली की तिची हत्या झाली हा तपास होणे गरजेचे आहे, त्यासाठी सरकारकडे विशेष पोलीस पथकाची मागणी केली जात होती. मात्र सरकारने कुटुंबियांच्या तोंडाला पाने पुसली, असे शेख म्हणाले.
डॉक्टर तरुणीचा मृत्यूआधी छळ झाला, आता न्याय मिळवण्यासाठीही झुंजावे लागत आहे. तेजस्वी सातपुते यांच्या देखरेखीखाली तपास होईल, असे पत्र काढून शब्दांचा खेळ केला आहे. देवाभाऊ तुम्ही कोणाला वाचवताय? कशामुळे विशेष पोलीस पथक स्थापन करत नाही? असाही प्रश्न मेहबूब शेख यांनी विचारला. निवृत्त न्यायाधीश आणि महिला आयपीएस आधिकाऱ्याच्या देखरेखीखाली तपास होणे अपेक्षित आहे, असे शेख म्हणाले.
advertisement

विशेष पोलीस महासंचालकांनी काढलेल्या पत्रात नेमके काय म्हटले आहे?

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येबाबत दाखल गुन्ह्याच्या तपासावरील देखरेखीबाबत राज्य शासनाने एक पत्रक काढले आहे. यात त्यांनी म्हटले आहे, सदर गुन्ह्यामध्ये पोलीस खात्यातील एक पोलीस उपनिरीक्षक आरोपी असून सदर प्रकरण अतिशय संवेदनशील बनलेले आहे. तरी सदर प्रकरणाच्या तपासावर योग्य पद्धतीने देखरेख होणे गरजेचे असल्याने श्रीमती तेजस्वी सातपुते (समादेशक, रा.रा.पो.बल गट क्र.०९, पुणे) यांना या गुन्ह्याच्या तपासावर देखरेख करण्यासाठी या आदेशाद्वारे नियुक्ती करण्यात येत आहे. श्रीमती तेजस्वी सातपुते यांनी तात्काळ सातारा येथे जाऊन सदर गुन्ह्याबाबत पोलीस अधीक्षक, सातारा आणि तपासी अधिकारी यांचेकडून सविस्तर माहिती घ्यावी तसेच गुन्ह्याचा पुढील तपास योग्य पध्दतीने आणि कालमर्यादेत होईल हे सुनिश्चित करावे. त्याचबरोबर गुन्ह्याच्या तपासाचा प्रगती अहवाल वेळोवेळी कार्यालयास सादर करावा, असे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आधी डॉक्टरचा छळ केला, आता SIT चा खेळ केला, महेबबू शेख यांचा गंभीर आरोप
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement