सालगड्याचं अपहरण करून अंग निळं होईपर्यंत मारहाण, तोंडावर केली लघुशंका; पोलीस फौजदारालाही मारलं, बीडमधील घटना
- Published by:Sachin S
Last Updated:
या सालगड्याला सोडवण्यासाठी निवृत्त सहायक फौजदार गेले असता त्यांना १० ते १५ जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.
सुरेश जाधव, प्रतिनिधी
बीड : बीडमधील माजलगावमध्ये उपसरपंचाला अमानुष मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही घटना ताजी असताना आणखी एक धक्कादायक घटना माजलगावमधून समोर आली आहे. माजलगावमध्ये एका सालगड्याचं अपहरण केलं होतं. या सालगड्याला सोडवण्यासाठी निवृत्त सहायक फौजदार गेले असता त्यांना १० ते १५ जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. संतापजनक म्हणजे, मारहाणीनंतर सालगड्याने पाणी मागितली तर तोंडामध्ये लघुशंका केल्याचा आरोप केला आहे. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी १२ ते २ या वेळेत बीडच्या माजलगाव तालुक्यातील ढोरगाव शिवारात ही घटना घडली. राजाराम दाजीबा सिरसाट (वय ६१ रा.चिंचगव्हाण ता.माजलगाव) असं जखमीचं नाव आहे. जखमीवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून रात्री ९ वाजता माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सालगड्याला अपहरण केल्यानंतर सोडविण्यासाठी गेलेल्या निवृत्त सहायक फौजदाराला १० ते १५ जणांनी बेदम मारहाण केली. यात चार ते पाच ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहे.
advertisement
मारहाण करून तोंडावर केली लघुशंका
view commentsराजाराम दाजीबा सिरसाट हे त्यांच्याकडे सालगडी आहे, तर नात जावई विश्वनाथ पंडीत आहेत. ते दारू पिण्याच्या आहारी गेले. दोघेही ऊसतोड मजूर असून मंजरथ (ता.पाथरी) येथील एका मुकादमाकडून १२०० रूपये घेतले होते. विश्वनाथने मुकादमाकडून घेतलेले पैसे परत न दिल्याने वाद झाला होता. त्यातून मुकादमाच्या माणसाने त्यांचं अपहरण करून लवूळ येथील स्मशानभूमीत नेलं. तिथे विश्वनाथने राजाराम यांना संपर्क करून बोलावून घेतलं. यावेळी मुकादमाने १२०० रूपयांच्या बदल्यात दीड लाख रूपयांची मागणी केली. हे पैसे घेऊन गेल्यानंतर त्यांनी विश्वनाथला सोडून राजाराम यांना पकडलं. यावेळी मुकादमाच्या माणसांनी शिरसाट यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर दुचाकीवरून ढोरगाव शिवारात नेलं. तिथे कत्ती, लोखंडी रॉड, काठ्या आदींनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांनी पाणी मागितलं तर त्यांच्या तोंडावर लघुशंका केली, असा आरोप पीडितने केला आहे. दोन तास मारहाण केल्यानंतर मुलाने येऊन सुटका केली. शिरसाट यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
Location :
Bid,Maharashtra
First Published :
July 12, 2025 10:39 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सालगड्याचं अपहरण करून अंग निळं होईपर्यंत मारहाण, तोंडावर केली लघुशंका; पोलीस फौजदारालाही मारलं, बीडमधील घटना


