असे करा काळ्या मातीत पेरलेल्या हरभरा पिकातील घाटे अळी रोगाचे व्यवस्थापन
- Reported by:Patel Irfan Hassan
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
हरभरावर येणार प्रमुख रोग कोणते व त्याचे व्यवस्थापन कशाप्रकारे करावे यासंदर्भातील अधिक माहिती मोहोळ तालुक्यातील कृषी विज्ञान केंद्रात कार्यरत असलेले डॉ. पंकज मडावी यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
सोलापूर: रब्बी हंगामाला सुरुवात झाली की सोलापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमध्ये हरभरा लागवडीला वेग येतो. हरभरा थंड आणि कोरड्या हवामानातील पीक असून ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात त्याची लागवड केली जाते. हरभरावर येणार प्रमुख रोग कोणते व त्याचे व्यवस्थापन कशाप्रकारे करावे यासंदर्भातील अधिक माहिती मोहोळ तालुक्यातील कृषी विज्ञान केंद्रात कार्यरत असलेले डॉ. पंकज मडावी यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
हरभरा हे कडधान्य पीक असून महाराष्ट्रामध्ये 43.99 लाख हेक्टर क्षेत्रावर या हरभऱ्याची लागवड केली जाते. याच हरभऱ्याच्या पिकावर कीड आणि रोग पाहायला मिळतात. हरभरा पिकावर पडणाऱ्या रोगाचा विचार केला. यामध्ये बुरशीजन्य रोग, जिवाणूजन्य रोग तसेच विषाणूजन्य रोग पाहायला मिळतात. तसेच प्रमुख किडीचा रोगाचा विचार केला तर घाटेअळीची प्रमुख समस्या पाहायला मिळते. डॉ. पंकज मडावी यांनी पिकावरून घाटेअळी कशी काढावी? याबद्दल सांगितलेय.
advertisement
घाटअळी रोगाचे व्यवस्थापन कसे करावे?
हरभऱ्याच्या पिकावरील पानावर सुरुवातीला लहान अळ्या आवरण खरडून खातात. काही पानांवर 80 जाळीदार आणि भुरकट पांढरी पडलेली दिसतात. तसेच विकसित झालेले घाटे अळी हरभऱ्या पिकावरील कळ्या, फुले खातात तसेच आतील दाने फस्त करतात. जर आपल्या हरभरा पिकावर घाटे अळी रोगाचे व्यवस्थापन करायचे असेल तर 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करून झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे हेलीओकिल विषाणूजींना कीटकनाशकाची 10 मिली 10 लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी करावी.
advertisement
आवश्यकता असल्यास किंवा जास्त घाट्या आवश्यकता असल्यास किंवा जास्त घाटे अळीचा प्रादुर्भाव असल्यास इमामेक्टीन बेनझोईट 5 एस.जी 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात टाकून फवारणी करून घ्यावे किंवा क्वीनॉलफॉस 20 मिली प्रति दहा लिटर पाण्यात टाकून फवारणी करणे गरजेचे आहे. अशाप्रकारे एकात्मिक पद्धतीने हरभरा पिकावर पडणाऱ्या घाटे अळी रोगाचे व्यवस्थापन केल्यास हरभरा पिकावर या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. त्याचबरोबर शेतामध्ये पक्षी थांबे लावणे सुद्धा गरजेचे आहे. घाटे अळी जेव्हा अळी अवस्थेमध्ये असतात तेव्हा पक्षी हे अळी खाऊन टाकतात.
advertisement
त्यामुळे शेतकऱ्यांनी हरभऱ्याच्या शेतामध्ये कमीत कमी 50 ते 60 पक्षी थांबे लावणे गरजेचे आहे. अशाप्रकारे हरभरा पिकाची काळजी घेतल्यास हरभरा उत्पादनात वाढ होऊन बळीराजाच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ होईल.
Location :
Maharashtra
First Published :
Nov 30, 2025 7:53 PM IST









