कुणाला मतदान करायचं आणि कुणाला पाडायचं? मनोज जरांगेंनी बीडला जाऊन सांगितलं!

Last Updated:

कुणाच्याही प्रचाराला आणि सभेलाही जाऊ नका, माझा निरोप आला तर बघू आणि नाही आला तर तुमच्या हिताचा निवडून येईल तिकडेच मतदान करायचं पण शक्यतो पाडापाडी कराच असे आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले आहे.

जरांगे पाटलांचे मराठा समाजाला आवाहन
जरांगे पाटलांचे मराठा समाजाला आवाहन
सुरेश जाधव, बीड :  लोकसभेत दिसलेला जरांगे फॅक्टर विधानसभेतही दिसणार आहे.पण तो किती निर्णायक ठरेल हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यात जरांगेंनी अचानक निव़डणुकीतून माघार घेतली आहे.त्यामुळे आता ते पुढे काय करणार याची उत्सुकता समाजाला लागली आहे. अशात मनोज जरांगे यांनी तुमच्या हिताचा असेल त्यालाच निवडून द्या, बाकीच्यांची पाडापाडी करा,असं मोठं आव्हान मराठा समाजाला केलं आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे पाटलांनी आजपासून बीड जिल्ह्यातून दौऱ्याला सुरुवात केली आहे. यावेळी जरांगे म्हणाले की,विधानसभा निवडणुकीसाठी ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले नाही, त्यांना खडेबोल सुनावत त्यांनीच पचका करून ठेवला आहे. मी ज्यांनी अर्ज भरले त्यांना सांगितले होते. अपक्ष अर्ज भरून मते खायचे काम करू नका, त्यामुळे ज्यांना पाडायचे आहे ते पडणार नाहीत. समाजाला सांगितले आहे. माझा पाठिंबा अपक्षाला आणि कुणालाच नाही,असे जरांगे यांनी सांगितले आहे.
advertisement

निवडणुकीतून माघार का घेतली?

जरांगेंनी यावेळी निवडणुकीतून माघार घेण्याचेही कारण सांगितले आहे. मला समाजाचे भविष्य बघायचं आहे. मूर्ख होऊन चालणार नाही. दीडशे जणांना उभे केले असते, मात्र त्यांच्यासाठी ६ कोटी समाजाचे वाटोळे करू शकत नाही. तो क्षणिक आनंद आहे. मला समाजाला आरक्षण देऊन आयुष्यभराचा आनंद द्यायचा आहे. मी मूर्खासारखे चाळे नाही करू शकत, मागे सरकलो म्हणून काय वाईट झाले. मी मराठा समाजाचे काम करतो दीडशे जणांचे काम करत नाही. त्यांच्यासाठी करोडो मराठ्यांना अडचणीत आणणार नाही. ते जर पडले असते तर समाजाला हिणले गेले असते टोमणे मिळाले असते, त्यामुळे माझी समाजाची मान खाली जाईल म्हणून मी माघार घेतली. समाजासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे. या राजकारणासाठी आरक्षण जायला नको म्हणून मी ही भूमिका घेतली, असे जरांगेंनी स्पष्ट केले.
advertisement
आज पासून पुन्हा एकदा आरक्षणाचा लढा सुरू झाला आहे. आम्हाला कुणाच्याही प्रचाराला जायची गरज नाही. आता पुन्हा लढा उभा करायचा आणि आरक्षण मिळवायचं,  राजकारणासाठी असतो तर उमेदवार उभे केले असते. माझा समाज माझ्यासाठी मोठा आहे. या समाजाला मी मायबाप मानलं आहे. समाज अडचणीत येऊ नये म्हणून मी योग्य पाऊल उचलत आहे.कुणाच्याही प्रचाराला आणि सभेलाही जाऊ नका, माझा निरोप आला तर बघू आणि नाही आला तर तुमच्या हिताचा निवडून येईल तिकडेच मतदान करायचं पण शक्यतो पाडापाडी कराच असे आवाहन जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कुणाला मतदान करायचं आणि कुणाला पाडायचं? मनोज जरांगेंनी बीडला जाऊन सांगितलं!
Next Article
advertisement
Raigad News: २३ वर्षांच्या पोरीने लाल बावटा फडकावला, शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक्ष
शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक
  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

View All
advertisement