Manoj Jarange Patil : ''मराठ्यांचे किती बळी हवेत?'' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, ''आरक्षण द्या नाहीतर...''

Last Updated:

Manoj Jarange Patil Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. सरकारला मराठ्यांचे किती बळी हवेत असा आर्त सवाल करताना त्यांनी गंभीर इशाराही दिला आहे.

''मराठ्यांचे किती बळी हवेत?'' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, ''आरक्षण द्या नाहीतर...''
''मराठ्यांचे किती बळी हवेत?'' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, ''आरक्षण द्या नाहीतर...''
अविनाश कानडजे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. सरकारला मराठ्यांचे किती बळी हवेत असा आर्त सवाल करताना त्यांनी गंभीर इशाराही दिला आहे. आरक्षण 100 टक्के मिळणारच असून जिव्हारी लागेल असे टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहनही जरांगे यांनी मराठा समाजाला केले आहे. काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासाठी काहींनी आत्महत्या केली असल्याचे समोर आले होते.
मनोज जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या मु्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करताना आगामी काळात आंदोलन उभारण्याचे संकेत दिले. मनोज जरांगे यांनी म्हटले की, मराठा बांधवांना विनंती आहे, आरक्षण 100 टक्के मिळणार आहे. जिव्हारी लागेल असे काम करू नका. बीड, जालना, सिल्लोड येथे आत्महत्या करण्यात आले. आत्महत्या करू नका असे आवाहन त्यांनी केले.
advertisement

मराठ्यांची लेकरं तुमची समजा, मुख्यमंत्र्यांना आवाहन...

मनोज जरांगे यांनी म्हटले की. मराठा आरक्षणासाठी तुम्हाला नेमके किती बळी हवे आहेत. मराठ्यांची लेकरं देखील तुमचं लेकरं आहे असे समजा असे आवाहन करताना तुम्हाला किती बळी घ्यायचे आहेत असा सवाल केला. मुख्यमंत्री तुम्ही आरक्षण देत नाही, ही कोणती मग्रुरी आहे. आम्हाला वेगळं आंदोलन करून तुम्हाला जेरीस आणावे लागेल. मुख्यमंत्र्यांनी तातडीने आरक्षण द्यावे अन्यथा आमचा संयम सुटणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. तुम्ही आमची मज्जा पाहणार असाल तर तुम्हाला याची फळं भोगावी लागतील असेही जरांगे यांनी म्हटले.
advertisement

मराठ्यांचे मुडदे पडू देऊ नका...

मनोज जरांगे यांनी म्हटले की, मुख्यमंत्री तुम्हाला माणुसकी नाही का? मराठ्यांचे मुडदे पडू देऊ नका, पोरं धडाधड आत्महत्या करत आहेत. तुम्हाला मराठा समाजाची दयामाया येत नाही. तुमच्यामुळे आमच्या आत्महत्या होत असल्याचेही जरांगे यांनी म्हटले.

इतर संबंधित बातमी :

advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Manoj Jarange Patil : ''मराठ्यांचे किती बळी हवेत?'' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, ''आरक्षण द्या नाहीतर...''
Next Article
advertisement
ZP Election: आता शाई पुसून दाखवाच! जिल्हा परिषदसाठी निवडणूक आयोगाचा नवा प्लॅन तयार, घेतला मोठा निर्णय
आता शाई पुसून दाखवाच! जिल्हा परिषदसाठी निवडणूक आयोगाचा नवा प्लॅन तयार, घेतला मोठ
  • मतदारांच्या बोटावर लावलेली मार्करची शाई सहज पुसली जात असल्याचे आरोप

  • निवडणूक आयोगाने यावर स्पष्टीकरण देत मतदारांचा गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न केला

  • जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार

View All
advertisement