''मराठ्यांनी मोठं केलं, मला सांभाळा'' मुंडे-कराडांनी भेट घेतल्याचा जरांगेंचा गौप्यस्फोट
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Manoj Jarange Patil : धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे मला भेटण्यासाठी आले होते, असा गौप्यस्फोट जरांगे पाटील यांनी केला आहे.
अविनाश कानडजे, प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राज्याचे मंत्री धनंजय मु्ंडे यांच्यावर सातत्याने टीका सुरू आहे. तर, त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हे हत्या प्रकरणात तुरुंगात आहेत. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे मला भेटण्यासाठी आले होते, असा गौप्यस्फोट जरांगे पाटील यांनी केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोपांची फैरी झाडली. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना यंत्रणा सोडणार नाही. ही आरोपींची टोळी धनंजय मुंडे यांची आहे. आरोपींना लपवत जात असून यांच्या एका नेत्याला जिवंतपणी मरण याताना भोगाव्या लागल्याचे जरांगे यांनी म्हटले.
मुंडे-कराड भेटायला आले होते...
धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड मला भेटण्यासाठी आले होते, असा दावा मनोज जरांगे यांनी केला.मला भेटण्यासाठी आल्यानंतर मला सांभाळा असे म्हणाले होते. हे दोघेही जण रात्रीच्या वेळी आले होते. मला या दोघांना भेटण्याची इच्छा नव्हती. मात्र, ते बराच वेळ बाहेर थांबले होते. त्यामुळे त्यांना भेटलो असल्याचे जरांगे यांनी म्हटले. कराडला पाहताच आपण हाच शेतकऱ्यांचे हार्वेस्टींगचे पैसे खाणारा आहे का असे म्हटले असल्याचेही जरांगे यांनी म्हटले.
advertisement
धनंजय मुंडे यांच्या भेटीत काय झालं?
मनोज जरांगे पाटील यांनी त्या भेटीबाबत सांगताना म्हटले की, धनंजय मुंडे निवडणुकीपूर्वी मला भेटायला आले होते. त्याआधी 8 दिवसापासून फोन येत होते. धनंजय मुंडे हे रात्री 2 वाजता आले, सोबत कराड होता. मला सांभाळा असे त्यांनी म्हटले. मी झोपलो होते ते आत आले. त्यांनी कराडची ओळख करून दिली. त्यावेळी मी त्यांना हार्व्हेस्टरचे पैसे बुडवणार असल्याचे त्यांना म्हटलं होतं. धनंजय मुंडे यांनी जाताना लक्ष राहु द्या, मराठ्यांनी मला मोठं केलं असल्याचे म्हटले होते, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.
advertisement
मुख्यमंत्री तुम्हाला माणुसकी नाही का?
मुख्यमंत्री तुम्हाला माणुसकी नाही का? असा सवालही जरांगे यांनी केला. मराठ्यांचे मुडदे पडू देऊ नका, पोरं धडाधड आत्महत्या करत आहे... तुम्हाला मराठा समाजची दयामाया नाही.... तुमच्यामुळे आमच्या आत्महत्या होत आहेत असा आरोपही जरांगे यांनी केला. मुख्यमंत्री तातडीने आरक्षण द्या अन्यथा आमचा संयम सुटणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
February 03, 2025 12:17 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
''मराठ्यांनी मोठं केलं, मला सांभाळा'' मुंडे-कराडांनी भेट घेतल्याचा जरांगेंचा गौप्यस्फोट


