Marathi Melava : 'राज यांच्याशी हातमिळवणी म्हणजे...', मराठी मेळाव्यानंतर उद्धव ठाकरेंवर भाजप, शिंदे गटाचे बोचरे वार
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Uddhav Thackeray Raj Thackeray : सरकारने त्रिभाषेचा जीआर रद्द केल्यानंतर आज मराठी विजय मेळावा साजरा केला जात आहे. आजच्या या मेळाव्यावर आता राजकीय वर्तुळात पडसाद उमटू लागले आहेत. उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने जोरदार हल्लाबोल केला.
मुंबई: वरळीतील NSCI डोममध्ये आज मराठी मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे बंधूंच्या एकजुटीचा ग्रँड शो झाला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू जवळपास 19 वर्षाच्या कालावधीनंतर राजकीय मंचावर एकत्र आले. सरकारने त्रिभाषेचा जीआर रद्द केल्यानंतर आज मराठी विजय मेळावा साजरा केला जात आहे. आजच्या या मेळाव्यावर आता राजकीय वर्तुळात पडसाद उमटू लागले आहेत. उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने जोरदार हल्लाबोल केला.
सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने आजच्या मराठीच्या मेळाव्यावर टीका करताना उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरे वार करताना राज ठाकरे यांना झुकतं माप दिलं आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी भाषेसाठी नाही ही तर.. निवडणूकीसाठी जाहीर मनधरणी असल्याचे म्हटले. महापालिका निवडणूका जवळ आल्यामुळे भाजपाला घाबरलेल्या उबाठा सेनेला आता "भाऊबंदकी" आठवली... ज्या भावाला घराबाहेर काढले त्याची जाहीर मनधरणी करण्यासाठी आजचा वरळीचा कौटुंबिक स्नेह मिलनाचा कार्यक्रम होता, अशी टीकादेखील शेलार यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरें यांच्याशी केलेली हातमिळवणी म्हणजे निवडणूकीत हरणार म्हणून कुटुंबतहात जिंकण्याचा प्रयत्न असल्याचे शेलार यांनी म्हटले.
advertisement
भाषेसाठी नाही ही तर.. निवडणूकीसाठी जाहीर मनधरणी !
महापालिका निवडणूका जवळ आल्यामुळे भाजपाला घाबरलेल्या उबाठा सेनेला आता "भाऊबंदकी" आठवली... ज्या भावाला घराबाहेर काढले त्याची जाहीर मनधरणी करण्यासाठी आजचा वरळीचा कौटुंबिक स्नेह मिलनाचा कार्यक्रम होता.
भाषेचे प्रेम वगैरे काही…
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 5, 2025
advertisement
तर, दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडूनही आपल्या ट्वीटर हँडलवरून एक कविता ट्वीट करत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची तुलना करण्यात आली. यामध्ये उद्धव यांच्यापेक्षा राज हेच सरस असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला.
एक प्रबोधक, दुसरा प्रक्षोभक
एक उजवा, दुसरा डावा
एक धाकला असून थोरला
दुसरा थोरला असून धाकला
एक मराठी प्रेमी, दुसरा खुर्चीप्रेमी
एकाच्या मुखी आसूड, दुसऱ्याच्या तोंडी सूड!
एक मराठीचा पुरस्कर्ता, दुसरा तिरस्कर्ता
एक प्रगल्भ, दुसरा वेडापिसा
एकाचा मराठीचा वसा
दुसऱा भरतोय खिसा
एकाचा…
— Shivsena - शिवसेना (@Shivsenaofc) July 5, 2025
advertisement
शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री संजय सिरसाट यांनी म्हटले की, राज ठाकरे यांनी संयमी भाषण केले, मुद्देसुद भाषण केले. पण उद्धव ठाकरे भाषण तेच टोमणे होते. सर्वकाही आलबेल आहे, असं काही घडलं नसल्याचेही त्यांनी सांगितले. उद्धव यांनी युतीची साद घातली असली तरी राज यांनी त्यावर प्रतिसाद दिला का, असा उलट सवाल केला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 05, 2025 3:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Marathi Melava : 'राज यांच्याशी हातमिळवणी म्हणजे...', मराठी मेळाव्यानंतर उद्धव ठाकरेंवर भाजप, शिंदे गटाचे बोचरे वार