सोमय्यांच्या ज्या आरोपांनी रान उठवलं, 'त्याच' प्रकरणात वायकरांना मोठा दिलासा!

Last Updated:

रवींद्र वायकर हे ठाकरे गटात असताना याच प्रकरणावरून किरीट सोमय्या यांनी त्यांच्या विरोधात आरोपाचे रान उठवलं होतं. रवींद्र वायकर यांनी मातोश्री स्पोर्टस ट्रस्ट आणि सुप्रीमो बॅक्वेटच्या नावाने शेकडो कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता.

रवींद्र वायकरांना दिलासा
रवींद्र वायकरांना दिलासा
Ravindra Waikar : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. उद्या सोमवारी सायंकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. अशात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर त्यांच्या पत्नी मनीषा वायकर तसेच त्यांच्या भागिदारांविरोधातील फौंजदारी प्रकरण पुराव्याअभावी बंद करण्यात आले आहे.वायकरांवर मुंबई महापालिकेची दोन लाख वर्ग फूट जमिनीवर अनधिकृत कब्जा केला असून तिथे 500 कोटीचं पंचतारांकीत हॉटेल उभारल्याचा आरोप भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केला होता. या आरोपानंतर वायकर तुरूंगात जातील अशी चर्चा होती. मात्र आता वर्षभरानंतर आता त्यांची आरोपातून सूटका करण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाईम्सने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. जोगेश्वरीमधील वेरावली भागात पंचतारांकीत हॉटेलचे बांधकाम करण्यासाठी विशिष्ट माहिती दडवून व दिशाभूल करून मुंबई महापालिकेची परवानगी मिळवल्याचा वायकरांवर आरोप होता. पण आता या प्रकरणात पुरावे नसल्याचे म्हणत मुंबई पोलिसाच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट गिरगाव न्यायालयायाचे न्यायदंडाधिकारी एस.आर. निमसे यांनी नुकताच स्विकारला आहे. त्यामुळे आता रवींद्र वायकर, मनिषा वायकर तसेच त्यांच्या भागिदारांविरोधात दाखल झालेले फौजदारी प्रकरण आता बंद झाले आहे.
advertisement
विशेष म्हणजे रवींद्र वायकर हे ठाकरे गटात असताना याच प्रकरणावरून किरीट सोमय्या यांनी त्यांच्या विरोधात आरोपाचे रान उठवलं होतं. रवींद्र वायकर यांनी मातोश्री स्पोर्टस ट्रस्ट आणि सुप्रीमो बॅक्वेटच्या नावाने शेकडो कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेले खुले क्रिंडागण आणि गार्डनसाठी असलेल्या जागेचा कब्जा करून हॉटेल बांधायला सुरूवात केल्याचा आरोप केला होता. या हॉटेलची किंमत 500 कोटी असल्याचा दावाही वायकर यांनी केला होता.
advertisement
तसेच गार्डनच्या जागेवर वायकर यांनी सुप्रीमो कंपनीद्वारे आधी सुप्रीमो बॅक्वेट बांधल. या बागेची रेडी रेकरनुसार 4 कोटी किंमत होती. मात्र वायकर यांनी हा भूखंड तीन लाख रूपयात खरेदी केला आहे. आणि त्या जागेवर आता लग्न, पार्टी आणि अनधिकृत व्यवहार सूरू असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.
दरम्यान सोमय्या यांच्या या आरोपानंतर रविंद्र वायकर तुरूंगाच जातील, असे बोलले जात होते.मात्र आता या प्रकरणात पुरावे नसल्याचे म्हणत मुंबई पोलिसाच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट गिरगाव न्यायालयायाचे न्यायदंडाधिकारी एस.आर. निमसे यांनी नुकताच स्विकारला आहे. त्यामुळे आता रवींद्र वायकर, मनिषा वायकर तसेच त्यांच्या भागिदारांविरोधात दाखल झालेले फौजदारी प्रकरण आता बंद झाले आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सोमय्यांच्या ज्या आरोपांनी रान उठवलं, 'त्याच' प्रकरणात वायकरांना मोठा दिलासा!
Next Article
advertisement
Ambernath Nagar Parishad Results: राडा, गोळीबाराने गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच्या मतमोजणीस सुरुवात,  निकालाचा पहिला कल काय?
राडा, गोळीबाराने गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेची मतमोजणीस सुरू, निकालाचा पहिला क
  • Ambernath Nagar Parishad Results: राडा, गोळीबाराने गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच

  • Ambernath Nagar Parishad Results: राडा, गोळीबाराने गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच

  • Ambernath Nagar Parishad Results: राडा, गोळीबाराने गाजलेल्या अंबरनाथ नगर परिषदेच

View All
advertisement