Municipal Election: महापालिकांच्या निवडणुका किती टप्प्यात, कधी होणार? समोर आली अपडेट
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:AJIT MANDHARE
Last Updated:
Municipal Election : मागील काही दिवसांपासून निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीसाठीच्या हालचाली सुरू होत्या. आता महापालिका निवडणूक कधीपासून सुरू होणार, याची मोठी अपडेट समोर आली आहे.
मुंबई: राज्यातील महापालिका निवडणुकांसाठीचे काउंटडाउन सुरू झाले आहे. मागील काही दिवसांपासून निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीसाठीच्या हालचाली सुरू होत्या. आता महापालिका निवडणूक कधीपासून सुरू होणार, याची मोठी अपडेट समोर आली आहे. १५ डिसेंबरपासून राज्यभरात महापालिका निवडणुकांची प्रक्रिया सुरू होणार असून त्याच दिवशी आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे. मात्र, राज्यातील महापालिका निवडणुकांबाबत निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी महत्त्वाची अपडेट दिली आहे.
नगर परिषद, नगर पालिकांच्या निवडणुकीच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांकडे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ डिसेंबर २०२५ पासून निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची दाट शक्यता आहे. नगर परिषद निवडणुका एकाच टप्प्यात पार पडल्या तरी महापालिका निवडणुका टप्प्यांमध्ये पार पडणार आहे.
>> किती टप्प्यात होणार महापालिका निवडणूक?
advertisement
निवडणूक आयोगाने या वेळी टप्प्याटप्प्याने मनपा निवडणुका घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार, प्रथम क आणि ड वर्गातील लहान महापालिकांच्या निवडणुका पार पाडल्या जातील. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात अ आणि ब वर्गातील मोठ्या महापालिकांच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड यांसारख्या प्रमुख महापालिकांच्या निवडणुका एकत्रित आणि एकाच टप्प्यात घेण्याचे संकेत मिळत आहेत. मोठ्या शहरांच्या निवडणुका एकत्र झाल्यास राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
advertisement
सध्या राज्यातील सर्वच पक्षांनी महापालिका निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. विशेषतः मुंबई, पुणे आणि ठाणे येथील महापालिका निवडणुका या वेळेस राजकीय प्रतिष्ठेच्या लढती ठरणार आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 09, 2025 1:33 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Municipal Election: महापालिकांच्या निवडणुका किती टप्प्यात, कधी होणार? समोर आली अपडेट


