कुणाची सून, कुणाची बायको तर कुणाचा पोरगा, नेत्यांच्या कुटुंबातलं कोण कोण निवडून आलं? राज्यातल्या घराणेशाहीची संपूर्ण यादी

Last Updated:

Dynastic Politics: राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरूणांनी राजकारणात यावं, त्यांनी कर्तृत्वावर यश मिळवावं, अशी बौद्धिके नेते देत असतात. परंतु घराणेशाहीच्या राजकारणात त्यांचा टिकाव लागत नसल्याचेच चित्र निकालातून स्पष्ट झाले आहे.

राज्यातील घराणेशाहीची यादी
राज्यातील घराणेशाहीची यादी
मुंबई : राज्यातील २८८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल रविवारी लागला असून अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी महायुतीतील पक्ष वरचढ ठरले. महाविकास आघाडी तुलनेत कमी शक्ती लावूनही अनेक जागांवर जिंकली. काँग्रेसची फारशी चर्चा नसतानाही पक्षाचे तब्बल ३५ नगराध्यक्ष निवडून आले. एकनाथ शिंदे यांनी अर्धशतक ओलांडले तर अजित पवार अर्धशतकाच्या जवळ पोहोचले. ठाकरे सेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला कमी जागांवर विजय संपादन करता आला. अशा परिस्थितीत सर्वपक्षीय घराणेशाहीने मात्र जोरदार कामगिरी केली. राज्यात नेत्यांच्या घरातील ३२ नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी विजय संपादन केला.
घराणेशाहीचा विषय राजकारणात नेहमीच चर्चेत असतो. त्याचं कारणही तसंच आहे. कार्यकर्त्यांच्या जीवावरच नेत्यांचं राजकारण सुरू असतं. सोशल मीडियावर विरोधकांच्या विरोधात पोस्ट करणं असो की रस्त्यावर उतरून प्रचार करणं असो किंवा अंगावर केसेस घेणं असो यासाठी कार्यकर्ते पुढे असतात. याच साठी नेत्यांना कार्यकर्ते हवे असतात. मात्र हेच कार्यकर्ते नगराध्यक्ष व्हावे, आमदार व्हावे असं नेत्यांना वाटत नाही. परिणामी कार्यकर्ते सतरंजीच उचलत राहतात आणि नेत्यांचे कुटुंबीय खुर्चीवर, मोठ्या पदावर बसतात. राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरूणांनी राजकारणात यावं, त्यांनी कर्तृत्वावर यश मिळवावं, अशी बौद्धिके नेते देत असतात. मात्र सामान्य कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतही तिकीट मिळत नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत नेत्याला निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते मेहनत घेतात. मात्र आता खासदार, मंत्री आणि आमदारांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारीही त्यांच्याच घरात ठेवलीय.
advertisement

नेत्यांच्या कुटुंबातलं कोण कोण निवडून आलं? राज्यातल्या घराणेशाहीची संपूर्ण यादी

अ.क्र.मतदार संघविजयी उमेदवारपक्षनातं
1पंढरपूरप्रणिती भालकेस्थानिक आघाडीआमदार भगीरथ भालके यांची पत्नी
2अनगरप्राजक्ता पाटीलभाजपमाजी आमदार राजन पाटील यांची सून
3अक्कलकोटमिलन कल्याणशेट्टीभाजपआमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा भाऊ
4जामनेरसाधना महाजनभाजपमंत्री गिरीश महाजन यांची पत्नी
5चाळीसगावप्रतिभा चव्हाणभाजपआमदार मंगेश चव्हाण यांची पत्नी
6पाचोरासुनिता पाटीलशिवसेनाआमदार किशोर पाटील यांची पत्नी
7मुक्ताईनगरसंजना पाटीलशिवसेना उबाठाआमदार चंद्रकांत पाटील यांची मुलगी
8सिल्लोडसमीर सत्तारशिवसेनाअब्दुल सत्तार यांचा मुलगा
9अंबेजोगाईनंदकिशोर मुंदडास्थानिक आघाडीआमदार नमिता मुंदडा यांचे सासरे
10हिंगोलीरेखा बांगरशिवसेनाआमदार बांगर यांची वहिनी
11गंगाखेडउर्मिला केंद्रेराष्ट्रवादीमाजी मंत्री धनंजय मुंडे यांची बहीण
12पाथर्डीअभय आव्हाडभाजपमाजी आमदार बाबूजी आव्हाड यांचा मुलगा
13देवळालीसत्यजित कदमभाजपचंद्रशेखर कदम यांचा मुलगा
14श्रीरामपूरकरन ससाणेकॉंग्रेसमाजी आमदार ससाणे यांचा मुलगा
15राहातास्वाधीन गाडेकरभाजपमाजी नगराध्यक्ष यांचा मुलगा
16संगमनेरमैथिली तांबेस्थानीय आघाडीआमदार सत्यजित तांबे यांची पत्नी
17मुरगूडसुहासिनी परदेशीशिवसेनामाजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांची पत्नी
18जयसिंगपूरसंजय पाटीलस्थानिक आघाडीआमदार राजेंद्र पाटील यड्रवकर यांचा भाऊ
19आष्टाविशाल शिंदेराष्ट्रवादी शरद पवारमाजी आमदार विलासराव शिंदे यांचा मुलगा
20कागलसेहरनिदा मुश्रीफराष्ट्रवादीमंत्री हसन मुश्रीफ यांची सून
21कुरुंदवाडमनीषा उदय डांगेराजर्षी शाहू आघाडीमाजी नगराध्यक्ष कुटुंबातील
22नंदुरबाररत्ना रघुवंशीशिवसेनाआमदार रघुवंशी यांच्या पत्नी
23दोंडाईचानयनकुंवर रावलभाजपमंत्री जयकुमार रावल यांची आई
24शिरपूरचिंतन पटेलभाजपमाजी मंत्री अमरीश पटेल यांचा मुलगा
25धामणगाव रेल्वेअर्चना रोठेभाजपआमदार प्रताप अडसर यांच्या भगिनी
26दुधनीप्रथमेश म्हेत्रेशिवसेनामाजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे यांचे पुतणे
27साकोलीदेवश्री कापगतेभाजपमाजी आमदार हेमकृष्ण कापगते यांची सून
28बुलढाणापूजा गायकवाडशिवसेनाआमदार संजय गायकवाड यांची पत्नी
29खामगावअपर्णा फुंडकरभाजपमंत्री आकाश फुंडकर यांची भावजयी
30यवतमाळप्रियदर्शिनी उईकेभाजपमंत्री अशोक उईके यांची मुलगी
31पुसदमोहिनी नाईकराष्ट्रवादीमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी
32चंद्रपूरअरुण धोटेकाँग्रेसमाजी आमदार सुभाष धोटे यांचे बंधू
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कुणाची सून, कुणाची बायको तर कुणाचा पोरगा, नेत्यांच्या कुटुंबातलं कोण कोण निवडून आलं? राज्यातल्या घराणेशाहीची संपूर्ण यादी
Next Article
advertisement
चांदीपुढं सोनं का पडलं फिक्कं, वर्षभरात १३८ टक्के रिटर्न, रेकोर्ड ब्रेक दराचं कारण काय?
चांदीपुढं सोनं का पडलं फिक्कं, वर्षभरात १३८ टक्के रिटर्न, रेकोर्ड ब्रेक दराचं का
  • चांदीपुढं सोनं का पडलं फिक्कं, वर्षभरात १३८ टक्के रिटर्न, रेकोर्ड ब्रेक दराचं का

  • चांदीपुढं सोनं का पडलं फिक्कं, वर्षभरात १३८ टक्के रिटर्न, रेकोर्ड ब्रेक दराचं का

  • चांदीपुढं सोनं का पडलं फिक्कं, वर्षभरात १३८ टक्के रिटर्न, रेकोर्ड ब्रेक दराचं का

View All
advertisement