Nagar Parishad Election : भाजपची त्सुनामी, पण काँग्रेसने फाईट दिली... कोणत्या 35 जागांवर पंजाचा धुरळा? पाहा पूर्ण लिस्ट

Last Updated:

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या विजयाची त्सुनामी आल्याचं पाहायला मिळालं.

भाजपची त्सुनामी, पण काँग्रेसने फाईट दिली... कोणत्या 35 जागांवर पंजाचा धुरळा? पाहा पूर्ण लिस्ट
भाजपची त्सुनामी, पण काँग्रेसने फाईट दिली... कोणत्या 35 जागांवर पंजाचा धुरळा? पाहा पूर्ण लिस्ट
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या विजयाची त्सुनामी आल्याचं पाहायला मिळालं. भाजपचे तब्बल 3 हजारांहून जास्त नगरसेवक तर 129 नगराध्यक्ष जिंकून आलेत. शिंदेंच्या शिवसेनेनं आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही या निवडणुकीत चांगली कामगिरी केली. शिवसेनेचा 56 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा 33 ठिकाणी विजय झाला. महायुतीनं 200 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला. निवडणुकीच्या मैदानात देवाभाऊच धुरंधर असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय.
भाजपच्या त्सुनामी लाटेत महाविकासआघाडी पाला पाचोळ्या सारखी उडून गेली. त्यामुळेचं नगरपरिषद निवडणुकीत राज्यात पुन्हा एकदा भाजप नंबर एकचा पक्ष ठरलाय. विधानसभेनंतर नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपनं जोरदार मुसंडी मारली. नगरपालिका निवडणुकीत मविआची धुळधाण उडाली.
ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसनं या निवडणुकीत एक प्रकारे बाय दिला होता. काही प्रमाणात काँग्रेसनं लढण्याचा प्रयत्न केला. मात्र महायुतीला रोखण्यात त्यांना यश आलं नाही, असं असलं तरी काँग्रेसला अनपेक्षित अशा 34 जागा मिळाल्या तर उद्धव ठाकरेंची शिवसेना 8 आणि शरद पवारांची राष्ट्रवादीही 8 जागांवर राहिली.
advertisement

कोणत्या जागांवर काँग्रेसचा विजय?

जिल्हानगरपरिषद / नगरपंचायतीचे नावविजयी उमेदवारांचे नावपक्ष
रत्नागिरीराजापूरहु्स्नबानू खलिपेकाँग्रेस
अहिल्यानगरश्रीरामपूरकरण ससाणे (आघाडी)काँग्रेस
धुळेसिंदखेडाकलावती माळीकाँग्रेस
कोल्हापूरशिरोळयोगिता कांबळेकाँग्रेस
कोल्हापूरवडगाव (कोल्हापूर)विद्या पोळकाँग्रेस
सांगलीपळूससंजीवनी पुदालेकाँग्रेस
छ. संभाजीनगरकन्नडशेख फरीन बेगमकाँग्रेस
छ. संभाजीनगरखुलताबादअमीर पटेलकाँग्रेस
नांदेडहिमायतनगरशेख रसिककाँग्रेस
नांदेडकंधारशहाजी नळगेकाँग्रेस
अकोलाबाळापूरअर्फिम परबिंद मोहम्मद जमीरकाँग्रेस
अमरावतीचिखलदराअब्दुल शेख हैदरकाँँग्रेस
अमरावतीदर्यापूरमंदा भारसाकडेकाँग्रेस
बुलढाणालोणारमिरा मापारीकाँग्रेस
बुलढाणामलकापूर (बुलढाणा)आतिक जवारी वालेकाँग्रेस
बुलढाणाशेगावप्रकाश शेगोकारकाँग्रेस
यवतमाळआर्णीनालंदा भरणेकाँग्रेस
यवतमाळघाटंजीपरेश कारियाकाँग्रेस
चंद्रपूरबल्लारपूरअलका वाढईकाँग्रेस
चंद्रपूरब्रह्मपूरीयोगेश मिसारकाँग्रेस
चंद्रपूरघुग्घुसदिप्ती सोनटक्केकाँग्रेस
चंद्रपूरमूलएकता समर्थकाँग्रेस
चंद्रपूरनागभीडस्मिता खापर्डेकाँग्रेस
चंद्रपूरराजुराअरुण धोटेकाँग्रेस
चंद्रपूरवरोराअर्चना ठाकरेकाँग्रेस
गोंदीयागोंदियासचिन शेंडेकाँग्रेस
गोंदीयागोरेगावतेजराम बिसनेकाँग्रेस
गोंदीयासालेकसाविजय फुंडेकाँग्रेस
नागपूरबुटीबोरीसुमित मेंढेकाँग्रेस
नागपूरमोहपामाधव चर्जनकाँग्रेस
वर्धादेवळीकिरण ठाकरेकाँग्रेस
वर्धापुलगावकविता ब्राह्मणकरकाँग्रेस
वर्धावर्धासुधीर पांगुळकाँग्रेस
advertisement

वडेट्टीवार जाएंट किलर

राज्यभरात भाजप आणि मित्रपक्षाला भरघोस यश मिळाल्याचं चित्र असताना चंद्रपूर मात्र त्याला अपवाद ठरलं. चंद्रपुरात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या होमपिचवर काँग्रेसनं मोठं यश संपादन केलं. चंद्रपुरात 11 पैकी 8 जागेवर काँग्रेसनं विजय मिळवलाय. तर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला अवघ्या 1-1 जागी समाधान मानावं लागलं. तर एका जागेवर अपक्षानं विजय मिळवला. विजयानंतर जल्लोष करताना विजय वडेट्टीवार यांनी डान्सही केला. 'चंद्रपूर मे टायगर अभी जिंदा हैं' अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nagar Parishad Election : भाजपची त्सुनामी, पण काँग्रेसने फाईट दिली... कोणत्या 35 जागांवर पंजाचा धुरळा? पाहा पूर्ण लिस्ट
Next Article
advertisement
Eknath Shinde Ambernath Nagar Parishad Result: अंबरनाथमध्ये शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? समोर आली १० कारणे....
शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं
  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

  • शिंदेंच्या वर्चस्वाला धक्का, प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कसा झाला पराभव? १० कारणं

View All
advertisement