

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा एक व्हिडीओ ट्विट केला.व्हिडीओत एक शेतकरी कुटुंब आपल्या जमिनीसाठी सरकारी अधिकाऱ्यांना भांडत असल्याचे दिसून येत आहे.कित्येकदा सांगूनही ऐकत नसल्याच्या मुद्द्यावरून महिलेने एका अधिकाऱ्याच्या मुस्कटातही मारल्याचे दिसून येते. या व्हिडीओत राहुल नार्वेकर दिसून येत असल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले होते. अखेर संजय राऊत यांनी व्हिडीओबाबतचे सनसनाटी खुलासे केले.





