Nagpur accident : अज्ञात वाहनानं पोलीस अधिकाऱ्याच्या दुचाकीला उडवलं, नागपुरात भीषण अपघात
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
नागपूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. भीषण अपघात झाला आहे, या अपघातामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
नागपूर, उदय तिमांडे, प्रतिनिधी : नागपूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. भीषण अपघात झाला आहे, या अपघातामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. अज्ञात वाहनानं पीएसआयच्या दुचाकीला उडवलं या घटनेत ते गंभीर जखमी झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला आहे. दीपक चोरपगार असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, अज्ञात वाहनाच्या धडकेत पीएसआय दीपक चोरपगार यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मानकापूर उड्डाणपुलावर घडली आहे. दीपक चोरपगार हे ड्युटीवरून घरी परतत होते. याचवेळी मानकापूर उड्डाणपुलावर त्यांच्या बाईकला अज्ञात वाहनानं जोरदाची धडक दिली, या अपघातामध्ये बाईकवरून पडल्यानं त्यांच्या डोक्याला मार लागला, ते या घटनेत गंभीर जखमी झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला.
advertisement
दीपक चोरपगार हे धंतोली पोलीस ठाण्यात तैनात होते, गुरुवारी रात्री ड्युटी संपवून घरी बाईकवरून जात असताना मानकापूर उड्डाण पुलावर अज्ञात वाहनाने त्यांच्या बाईकला धडक दिली. या अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्यानं त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Location :
Nagpur,Nagpur,Maharashtra
First Published :
August 24, 2024 8:59 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
Nagpur accident : अज्ञात वाहनानं पोलीस अधिकाऱ्याच्या दुचाकीला उडवलं, नागपुरात भीषण अपघात