बायकोच्या छळाला कंटाळून त्रासलेल्या नवऱ्याने गोदावरी नदीत मारली उडी

Last Updated:

Nanded News: पत्नीच्या छळाला कंटाळून नवऱ्याने गोदावरी नदीत मारली उडी मारल्याची घटना नांदेडमध्ये घडली.

बायकोच्या जाचाला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या
बायकोच्या जाचाला कंटाळून नवऱ्याची आत्महत्या
मुजीब शेख, नांदेड : नांदेड शहरातील गोवर्धन घाट पुलावरुन एका चाळीस वर्षीय व्यक्तीने गोदावरी नदीत उडी मारली. पत्नीच्या छळाला कंटाळून आयुष्य संपविण्याचा विचार असल्याचे चाळीस वर्षीय इसमाच्या खिशातल्या चिठ्ठीत आढळून आले.
गोवर्धन घाटावर तैनात असलेल्या जीव रक्षक दलाच्या जवानांनी संबंधित व्यक्तीचा जीव वाचवला. अशोक कांबळे असे या व्यक्तीचे नाव आहे. शहरातील आंबेडकर नगरात अशोक कांबळे यांचे वास्तव्य आहे.
जीव रक्षक दलाच्या जवानांना अशोक कांबळे यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळली . त्यात पत्नी आपला वीस वर्षापासून छळ करत असल्याचे लिहिलेले होते. पत्नीने मारहाण करुन हात मोडला, एक डोळा अपंग केला, सततच्या मारहाणीने माझे जीवन असह्य झाले आहे, असा उल्लेख चिठ्ठीत होता.
advertisement
पत्नीच्या छळामुळेच आपण आत्महत्येचा प्रयत्न करत होतो, असे पोलिसांना दिलेल्या जबाबात अशोक कांबळे यांनी म्हटले आहे. दरम्यान वजिराबाद पोलिसांनी त्यांना शासकीय रूग्णालयात दाखल केले असून पुढील कारवाई सुरू आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बायकोच्या छळाला कंटाळून त्रासलेल्या नवऱ्याने गोदावरी नदीत मारली उडी
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement