भररस्त्यात तलवारी, खंजर घेऊन हल्ला, एकाची हाताची बोटे कापली, 2 गटांमध्ये खतरनाक राडा!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
कोणत्यातरी जुन्या वादावरुन कायमच दोन गटांमध्ये वाद होताना पहायला मिळतात. अशा वादातून दोन गटांमध्ये हाणामारी, भांडण अशा घटना सतत समोर येत असतात. अशीच आणखी एक घटना समोर आलीय.
मुजीब शेख ,नांदेड: कोणत्यातरी जुन्या वादावरुन कायमच दोन गटांमध्ये वाद होताना पहायला मिळतात. अशा वादातून दोन गटांमध्ये हाणामारी, भांडण अशा घटना सतत समोर येत असतात. अशीच आणखी एक घटना समोर आलीय. नांदेडमधून ही घटना समोर आली असून युवकांच्या दोन गटात तलवार, खंजर ने मारहाण झाली. या गंभीर हाणामारीत काही लोक जखमी असून याचा परिणा वाहतुकीवरही पहायला मिळाला.
नांदेड जिल्हयातील मुखेड तालुक्यातील चांडोळा गावात भरदिवसा मुख्य रस्त्यावर युवकांच्या दोन गटात तलवारी आणि खंजर ने मारहाण झाली. युवकांच्या हातात तलवारी आणि खंजर पहायला मिळाले. अवैध्य वाळू वाहतुकीवरून हा प्रकार घडल्याची माहिती आहे.
चांडोळा येथे काही युवकांनी एक हायवा ट्रक पकडला होता. हा ट्रक पकडण्यावरून वाद झाला. काही वेळाने एका गाडीमधून तलवारी आणि खंजर घेऊन काही युवक तिथे आले. या युवकांनी खुलेआम या शस्त्रांचा वापर केला. दोन्ही गटात झालेल्या मारहाणीत दोघांच्या हाताची बोटे तुटली तर एकाच्या डोक्यावर तलवार मारण्यात आली.
advertisement
दरम्यान, मारहाणीत 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मुखेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी दोन्ही गटाकडून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात येत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 07, 2024 5:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
भररस्त्यात तलवारी, खंजर घेऊन हल्ला, एकाची हाताची बोटे कापली, 2 गटांमध्ये खतरनाक राडा!