ग्रामपंचायतीत भयंकर राडा,खुर्च्या फेकल्या, दांडक्यांसह लाथाबुक्क्यांनी मारहाण, ग्रामसभेत सदस्यांची कुस्ती,VIDEO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत ग्रामपंचायतीत तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. ग्रामसभा सूरू असताना अचानक दोन गट आमने सामने आले
Nashik News : नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत ग्रामपंचायतीत तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे. ग्रामसभा सूरू असताना अचानक दोन गट आमने सामने आले. या एका गटाकडून लाकडी दाडक्याने हल्ला केला तर दुसऱ्या गटाने खुर्च्या फेकून मारहाण करण्याचा प्रयत्न केला.तब्बल अनेक मिनिटं हा राडा सूरू होता. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या घटनेने मोठी खळबळ माजली आहे.
ग्रामपंचायतीच्या बैठकीत विविध समस्या, मुद्यावरून बाचाबाची किंवा किरकोळ वाद होत असतात. पण नाशिकच्या गोवर्धन ग्रामपंचायतीत तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे.यावेळी ग्रामपंचायत सदस्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. विषय मंजुरी वरून हा राडा झाल्याची माहिती समोर येतं आहे.
नाशिकच्या गोवर्धन ग्रामपंचायतीच्या बैठकीत तुफान राडा pic.twitter.com/lb062aN7vo
— News18Lokmat (@News18lokmat) August 21, 2025
advertisement
नाशिकच्या गोवर्धन ग्रामपंचायतीत आज ग्रामसभा बोलावण्यात आली होती. या ग्रामसभेला महिला पूरुष आणि तरूण वर्ग असे सगळेच उपस्थित होते. यावेळी विषय मंजुरी वरून बैठकीत मोठा राडा झाल्याची घटना घडली. यावेळी दोन गट आमने सामने आले होते. काहींनी लाकडी दाडक्यांनी मारहाण सूरू केली होती. तर काहींनी खुर्च्या हातात घेऊन फेकाफेकी सूरू केली होती. तर काही लोक लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होते. या दरम्यान काही महिला देखील या राड्यात सामील होत्या.
advertisement
तब्बल अनेक मिनिट हा राडा सूरू होता. दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली होती. या घटनेत कुणाला किती मार लागला आहे? कुणी गंभीररित्या जखमी झालेय की नाही?याची माहिती मिळू शकली नाही.या प्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार झाल्याची माहिती नाही आहे. पण या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Location :
Nashik [Nasik],Nashik,Maharashtra
First Published :
August 21, 2025 6:11 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ग्रामपंचायतीत भयंकर राडा,खुर्च्या फेकल्या, दांडक्यांसह लाथाबुक्क्यांनी मारहाण, ग्रामसभेत सदस्यांची कुस्ती,VIDEO