नाशिकमध्ये ठाकरे-पवारांना धक्का, निवडणुकीआधी शेकडो पदाधिकारी अजितदादांच्या राष्ट्रवादीत
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Nashik News: नाशिक जिल्ह्यातील देवळाली आणि इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
मुंबई : लोकांची कामे केली तर लोक आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहतात, हा आमचा अनुभव असून लोकांच्या अडीअडचणी सोडवा, त्यांच्या सुखदु:खात सहभागी व्हा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कार्यकर्त्यांना केल्या. नाशिक जिल्ह्यातील देवळाली आणि इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गट, वंचित आणि शरदचंद्र पवार गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या उपस्थितीत आज जाहीर पक्षप्रवेश केला.
नाशिक जिल्ह्यातील देवळाली आणि इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शेतकरी संघाचे नाशिक तालुकाध्यक्ष शरद गायके , शरदचंद्र पवार गटाचे नाशिक तालुकाध्यक्ष विष्णू थेटे, सचिन पिंगळे यांच्यासह नाशिक जिल्हयातील विविध पक्षातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील त्र्यंबकेश्वर येथील वंचित आघाडीचे नेते कृष्णा काशीद यांनीही आपल्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
advertisement
यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार सरोज अहिरे, आमदार शिवाजीराव गर्जे, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, आमदार संजय खोडके, आमदार हिरामण खोसकर, आमदार राजेश विटेकर आदी उपस्थित होते.
लोकांची कामे करा, निवडणुकीआधी कार्यकर्त्यांना अजितदादांचा कानमंत्र
शेतकरी, युवकांसाठी कुशल रोजगार देणार्या योजना सरकार राबवत आहे. केंद्र सरकारने राज्याला २० लाख घरांचे उद्दिष्ट दिले आहे. आपापल्या भागात या योजनांचा लाभ लोकांना कसा मिळेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. जितके लोकांपर्यंत पोहोचाल तेवढा पक्षवाढीला हातभार लागणार आहे असे सांगतानाच स्वातंत्र्याची ७८ वर्षे पूर्ण होत आली तरी अजूनही काही लोकं बेघर आहेत. त्यांना केंद्र व राज्य सरकारच्या या घरकुल योजनेचा लाभ नक्की मिळणार आहे असेही अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले.
advertisement
निवडणूक आयोग जर चुकत असेल तर न्यायव्यवस्था आहे ना
पराभव झाला तर विरोधक निवडणूक आयोगाला दोष देतात आणि जिंकले तर उदोउदो करतात. अरे निवडणूक आयोग जर चुकत असेल तर न्यायव्यवस्था आहे ना... असा संतप्त सवाल करतानाच मी बारामतीतून सलग निवडणूका जिंकलो आहे त्यात कधी असे काही घडले नाही, हेही आवर्जून अजितदादा पवार यांनी सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 12, 2025 9:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नाशिकमध्ये ठाकरे-पवारांना धक्का, निवडणुकीआधी शेकडो पदाधिकारी अजितदादांच्या राष्ट्रवादीत