नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी, ऐन दिवाळीत बंद राहणार या मार्गावरील बससेवा, कारण काय?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Nashik News: ऐन दिवाळीत नाशिकमधील सिटीलिंक बससेवा काही मार्गांवर तीन दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांना पर्यायी बसचा वापर करावा लागेल.
नाशिक: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा तसेच महाविद्यालयांना सुट्ट्या लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिक महानगर परिवहन महामंडळाने अर्थातच सिटीलिंक बस सेवेच्या वतीने नियमित बसेसच्या नियोजनात काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार 19 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर या कालावधीत सकाळ सत्रात रविवारच्या सुट्टीच्या नियोजनानुसार बसेस चालविण्यात येतील. तर दुपारच्या सत्रात नियमित बस सेवा चालू राहणार आहे.
22 ऑक्टोबरपासून नियमित बस सेवा सुरू ठेवण्यात येणार आहे. याशिवाय शाळा महाविद्यालयांच्या मार्गावरील व प्रवासी संख्या जास्त असणाऱ्या मार्गावर शाळा महाविद्यालयांच्या सुट्टीच्या कालावधीत नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार प्रवाशांनी आपले येण्या-जाण्याचे नियोजन करावे, असे आवाहन नाशिक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
advertisement
पास वितरण केंद्र तीन दिवस बंद
सिटीलिंकचे सर्व पास केंद्र 20 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबरपर्यंत बंद राहतील. तर केटीएचएम महाविद्यालयातील पास केंद्र दिनांक 19 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबरपर्यंत बंद राहतील. याची सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सिटिलिंक प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
तपोवन आगार
मार्ग क्रमांक 131: निमाणी ते गिरणारे - सद्यःस्थितीत सुरू असलेल्या 8 बस ऐवजी 4 बस चालविण्यात येतील. 4 बसच्या माध्यमातून दर 30 मिनिटांना बसफेरी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
advertisement
मार्ग क्रमांक 102: निमाणी ते बारदानफाटा मार्गे एच पी टी महाविद्यालय सद्यःस्थितीत सुरू असलेल्या सर्व 4 बस महाविद्यालयांना सुट्टी असल्याकारणाने बंद करण्यात येतील.
मार्ग क्रमांक 146: निमाणी ते सिन्नर सुरू असलेल्या बस व्यतिरिक्त 4 बस अतिरिक्त चालविण्यात येतील व दर 10 मिनिटांना बसफेरी उपलब्ध असेल.
मार्ग क्रमांक 152: नवीन सीबीएस ते पिंपळगाव सद्यःस्थितीत सुरू असलेल्या बस व्यतिरिक्त 4 बस अतिरिक्त चालविण्यात येतील व दर 10 मिनिटांना बसफेरी उपलब्ध असेल.
advertisement
नाशिकरोड आगारातील 7 मार्ग बंद
मार्ग क्रमांक 221 - नाशिकरोड ते शिंगवे बहुला मार्गे विहितगाव, मार्ग क्रमांक 222 नाशिकरोड ते शिंगवे बहुला मार्गे वाडीचे रान, मार्ग क्रमांक 223 नाशिकरोड ते शिंगवे बहुला मार्गे पिंपळगाव खांब, मार्ग क्रमांक 231 नाशिकरोड ते जेआयटी महाविद्यालय मार्गे सातपूर, मार्ग क्रमांक 220 नाशिकरोड ते मातोश्री महाविद्यालय, मार्ग क्रमांक 264 तपोवन ते आर्मी पब्लिक स्कूल, मार्ग क्रमांक 264 ए नाशिकरोड ते आर्मी पब्लिक स्कूल, असे एकूण 7 मार्गावरील बस शाळा, महाविद्यालयांना सुट्टी असल्याकारणाने बंद करण्यात येतील.
advertisement
मार्ग क्रमांक 210 नाशिकरोड ते दिंडोरी या मार्गावरील सद्यःस्थितीत सुरू बस व्यतिरिक्त 4 बस अतिरिक्त चालविण्यात येतील. मार्ग क्रमांक 202 - नाशिकरोड ते बारदान फाटा मार्गे एच पी टी महाविद्यालय - सद्यःस्थितीत सुरू असलेल्या 8 बस ऐवजी 4 बस चालविण्यात येतील. 4 बसद्वारे दर 40 मिनिटांना बसफेरी उपलब्ध असेल असे प्रवाशांना सांगण्यात येत आहे.
view commentsLocation :
Nashik,Maharashtra
First Published :
October 17, 2025 7:44 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी, ऐन दिवाळीत बंद राहणार या मार्गावरील बससेवा, कारण काय?