Horror Movie : 2 तास 19 मिनिटांचा हॉरर चित्रपट एकदा तरी पाहाच; क्लायमॅक्स पाहून फुटेल घाम

Last Updated:

Best Horror Comedy Movie on OTT :बॉलिवूडमधील एक मिस्ट्री थ्रिलर चित्रपट प्रत्येक वळणावर ट्विस्ट एंड टर्न्स आणतो. एकदा तरी हा 2 तास 19 मिनिटांचा चित्रपट पाहाच.

News18
News18
Horror Movie on OTT : लोकांमध्ये सध्या हॉरर चित्रपटांची क्रेझ प्रचंड वाढली आहे. त्यामुळेच बरेचसे निर्माते आता हॉरर कंटेंटकडे अधिक लक्ष देत आहेत. दरवर्षी अनेक अॅक्शन, थ्रिलर आणि रोमँटिक चित्रपटासह एखादा तरी हॉरर चित्रपट ओटीटी आणि थिएटरमध्ये रिलीज होतोच. जर तुम्हालाही हॉरर फिल्म्स पाहायला आवडत असतील, तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका धमाकेदार हॉरर फिल्मबद्दल सांगणार आहोत. हा चित्रपट पाहताना हसूही येईल आणि त्याचवेळी क्लायमॅक्स पाहून घामही सुटेल. हॉरर चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर दाक्षिणात्य सिनेसृष्टी यामध्ये खूपच पुढे आहे. मलयाळम फिल्म इंडस्ट्री हे एक उत्तम उदाहरण आहे. लोककथांवर, रहस्यांवर आणि स्थानिक संस्कृतीवर आधारित अनेक मल्याळम चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर आता प्रेक्षक फक्त ग्लॅमर किंवा रोमान्स नव्हे, तर अशा कथा पाहायला इच्छुक आहेत ज्या विचार करायला लावतात आणि कुटुंबासोबतही पाहता येतात. याच कारणामुळे हॉरर कॉमेडी फिल्म्सची मागणी झपाट्याने वाढत आहे, कारण त्या प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव देतात. झी5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.
काय आहे कथानक?
हॉरर चित्रपटाचं दिग्दर्शन विष्णु सासी शंकर यांनी केलं आहे आणि कथा अभिलाष पिल्लई यांनी लिहिलेली आहे. या चित्रपटात अर्जुन अशोकन, गोकुल सुरेश, सैजू कुरुप, बालू वर्गीज, मालविका मनोज आणि शिवदा हे कलाकार झळकले आहेत. 1 ऑगस्ट 2025 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. पुढे 26 सप्टेंबरला हा चित्रपट ओटीटीवर रिलीज झाला. या चित्रपटाचं नाव आहे “सुमती वलावु”. या मलयाळम चित्रपटाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या चित्रपटाची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे याची कथा. केरळमधील थिरुवनंतपुरम जिल्ह्यातील मायलमूडू गावातल्या “सुमती वलावु” नावाच्या वळणाशी संबंधित या चित्रपटाचं कथानक आहे. असं म्हणतात की 1950 च्या दशकात तिथे सुमती नावाच्या एका गर्भवती महिलेची तिच्या प्रियकराने हत्या केली होती. तेव्हापासून ती जागा भूताटकी समजली जाते. चित्रपटात दाखवले आहे की काही लोक त्या ठिकाणी पोहोचतात आणि तिथे घडणाऱ्या रहस्यमय घटनांचा सामना करतात, ज्या सुमतीच्या आत्म्याची खरी कहाणी उलगडतात.
advertisement
विशेष म्हणजे “सुमती वलावु” या चित्रपटाला समीक्षकांकडून आणि प्रेक्षकांकडूनही जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. ज्याचा अंदाज याच्या कमाईवरून लावता येतो. “सुमती वलावु” 2025 मधील 9वा सर्वाधिक कमाई करणारा मलयाळम चित्रपट ठरला आहे. IMDb वर या चित्रपटाला 7.8/10 अशी रेटिंग मिळाली आहे. या चित्रपटातील सिनेमॅटोग्राफी, पार्श्वसंगीत, भीती आणि विनोद यांचा संगम प्रेक्षकांनी खूपच पसंत केला. लोकांना हा चित्रपट यासाठी आवडला, कारण यात फक्त भीतीच नाही, तर भावना आणि मनोरंजन यांचा सुंदर समतोल आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Horror Movie : 2 तास 19 मिनिटांचा हॉरर चित्रपट एकदा तरी पाहाच; क्लायमॅक्स पाहून फुटेल घाम
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement