बापरे बाप! नाशिकमध्ये थेट बंगल्यातच घुसला बिबट्या; पुढचा थरार तुम्हीच VIDEO मध्ये पाहा

Last Updated:

नाशिकमध्ये आता पुन्हा बिबट्या दिसून आल्याने नागरिक दहशतीत आहेत.

नाशिकच्या बंगल्यात बिबट्या
नाशिकच्या बंगल्यात बिबट्या
नाशिक, 26 ऑगस्ट : वाघ, सिंह, बिबट्या असे प्राणी पाहण्यासाठी आपण नॅशनल पार्क, जंगल सफारी किंवा प्राणीसंग्रहालयात जातो. काही ठिकाणी तर या खतरनाक प्राण्यांचं दर्शन रस्त्यावरच होतं. अगदी नागरी वस्तीतही बिबट्या घुसल्याची कित्येक प्रकरणं आहेत. असंच एक प्रकरण समोर आलं आहे. नाशिकमध्ये चक्क एका बंगल्यात बिबट्या घुसला आहे.
नाशिकरोड परिसरात पुन्हा बिबट्या आढळून आला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा बिबट्या कैद झाला आहे. जय भवानी रोड परिसरात असलेल्या मनोहर गार्डनमधील एका बंगल्यात हा बिबट्या घुसला. बंगल्यातील पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. या परिसरात पाळीव प्राण्यावर बिबट्याने हल्ला करण्याची ही दुसरी वेळ आहे.  महिनाभरानंतर या परिसरात पुन्हा बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान वन विभागाने घटनास्थळी भेट देत परिसराची पाहणी केली आहे.
advertisement
नाशिक रोड परिसराला लागूनच लष्कराचं आर्टिलरी सेंटर आहे. या ठिकाणी घनदाट जंगलाचा परिसर आहे. त्यामुळे भक्ष आणि पाण्याच्या शोधात बिबट्या कधीकधी बाहेर येतात. काही भेटलं नाही तर परत निघून जातात. परंतु काही दिवसांपासून शहरात नागरी वस्तीत बिबट्या वावरत असल्याने नागरिक भीतीच्या सावटात राहत आहेत.
advertisement
कधीकाळी जंगलांमध्ये वास्तव्य करणारे बिबटे आता मानवी वसाहतीत शिरत असल्याने नाशिक शहराची ओळख लेपर्ड सिटी म्हणून होते आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
बापरे बाप! नाशिकमध्ये थेट बंगल्यातच घुसला बिबट्या; पुढचा थरार तुम्हीच VIDEO मध्ये पाहा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement