लेक कायमचा सोडून गेला, आक्रोश झाला; अंत्यसंस्काराची तयारी सुरू आली अन् घडलं असं काही…
- Published by:Prachi Amale
- Reported by:Laxman Ghatol
Last Updated:
तपासण्या केल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने सदर जखमी तरुणाला ब्रेन डेड म्हणून घोषित केल्याचा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला.
नाशिक : मृत्यू आणि जीवन यांच्यातील सीमारेषा कधीकधी इतकी धूसर होते की, त्यावर विश्वास ठेवणेही कठीण होऊन जाते. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका गावात असाच एक विचित्र आणि तितकाच हृदयस्पर्शी प्रसंग घडला. ज्यामुळे संपूर्ण गाव क्षणार्धात शोकातून आनंदात न्हाऊन निघाले. ज्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू होती, ती व्यक्ती जिवंत परतल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात 19 वर्षीय भाऊ लचेक नावाचा तरुण अपघातात गंभीर जखमी झाला. या गंभीर जखमी झालेल्या तरुणाला नाशिकच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तपासण्या केल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने सदर जखमी तरुणाला ब्रेन डेड म्हणून घोषित केल्याचा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला. मात्र या जखमी तरुणाच्या नातेवाईकांचा ऐकण्यात गोंधळ झाला आणि त्यांनी केवळ डेड म्हणजेच मृत्यू झाला असे समजून या तरुणाला अंत्यविधीसाठी घरी नेले.
advertisement
अंत्यविधीची तयारी सुरू असताना अचानक हालचाल
मात्र अंत्यविधीची तयारी सुरू असताना हा तरुण अचानक हालचाल करू लागल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आणि नेमकं काय घडतंय हेच या लोकांना समजले नाही. या नंतर जखमी युवकाला पुन्हा नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र हा तरुण ब्रेन डेड नसल्याचा खुलासा जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी केला. तर मेडिकल कॉलेज प्रशासनाने या जखमी तरुणाला त्याचे नातेवाईक खाजगी रुग्णालयात घेऊन जातो असं सांगून घेऊन गेले अशी माहिती दिली. या मुळे या प्रकरणातला गुंता अधिकच वाढला आहे,मात्र हा सगळा प्रकार गैरसमजुतीतून झाला आहे की आणखी दुसऱ्या काही कारणातून झाला हे मात्र समजू शकलं नाही,मात्र या प्रकरणाची जोरदार शहरात पाहायला मिळाली.
advertisement
कुटुंबियांना मोठा धक्का
क्षणभर कुणालाच काही कळेना. डोळ्यासमोर आपल्या मुलाचा मृतदेह समजून ठेवलेले पार्थिव आणि त्याच क्षणी जिवंत, सुखरूप परतलेला मुलगा! हे नेमकं काय घडतंय, याचा विचार करत सर्वजण अवाक् झाले. मृत्यूच्या दारातून परतलेल्या तरूणाला पाहताच काही क्षणांपूर्वी शोकसागरात बुडालेले कुटुंब आनंदाने गहिवरले. डोळ्यातील अश्रू अचानक आनंद अश्रूत बदलले. जे मृत झाले म्हणून अंत्यसंस्कार करणार होते, तेच प्रत्यक्षात परतल्याने कुटुंबियांबरोबरच ग्रामस्थांनाही आश्चर्याचा धक्का बसला.
Location :
Nashik [Nasik],Nashik,Maharashtra
First Published :
September 05, 2025 3:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
लेक कायमचा सोडून गेला, आक्रोश झाला; अंत्यसंस्काराची तयारी सुरू आली अन् घडलं असं काही…