सावधान! मुलांची चूक पालकांना भोवणार, नुसती तुरुंगवारी नाही, आता ‘मोक्का’ लागणार
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Nylon Manja: नाशिकमध्ये पतंग उडवण्यासाठी मुलाने चायनिज मांजा वापरल्यास थेट पालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. नव्या आदेशांबाबत जाणून घेऊ.
नाशिक: शहर आणि परिसरात नायलॉन आणि चायनीज मांजाची विक्री, वापर, साठवणूक आणि निर्मितीवर पोलिसांनी कठोर बंदी घातली आहे. हा जीवघेणा मांजा मानवांसोबतच पक्ष्यांसाठीही अत्यंत हानिकारक ठरत असल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी यासंदर्भात अत्यंत कडक पाऊल उचलले आहे.
अल्पवयीन मुलांच्या पालकांवर गुन्हा
नायलॉन मांजा वापरताना अल्पवयीन मुले आढळून आल्यास त्यांच्या पालकांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. यापूर्वी 15 जानेवारी 2025 पर्यंत नाशिक शहरात नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्या 5 हून अधिक अल्पवयीन मुलांच्या पालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते.
advertisement
मागील वर्षी जीवघेणा ठरला मांजा
नाशिकमध्ये या जीवघेण्या मांजामुळे गंभीर दुर्घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षी मांजामुळे पाथर्डी गावाजवळ एका दुचाकीस्वाराला आपला जीव गमवावा लागला होता. याच वर्षी संक्रांतीच्या तोंडावर जानेवारीमध्ये, मांजामुळे तीन दुचाकीस्वारांचे गळे चिरले जाऊन गंभीर जखमा झाल्या होत्या. तसेच, एका दुचाकीस्वाराचा गळा खोलवर चिरला गेल्याने अधिक रक्तस्त्राव होऊन मृत्यू झाला होता.
advertisement
तस्करांवर आता 'मोक्का'ची कारवाई
नायलॉन मांजाची तस्करी, विक्री किंवा साठवणूक संघटित साखळी पद्धतीने होत असल्याचे आढळून आल्यास, संबंधित टोळीचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध 'मोक्का' (MCOCA) कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. मागील वर्षी डिसेंबरपर्यंत चोरीछुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या 74 जणांना शहरासह जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते आणि शहरात 32 कारवाया झाल्या होत्या.
advertisement
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार
मानवी जीविताला धोका निर्माण करून कोणाचा बळी गेल्यास, संबंधित व्यक्तींविरुद्ध पोलिसांकडून सदोष मनुष्यवधाचा (Culpable Homicide) गुन्हा दाखल केला जाईल. मांजाची विक्री किंवा वापर करताना आढळल्यास त्वरित कारवाई करण्यासाठी गुन्हे शाखेच्या सर्व पथकांसह 13 पोलीस ठाण्यांच्या गुन्हे शोध पथकांना विशेष आदेश देण्यात आले आहेत.
साध्या दोऱ्याने घ्या पतंगबाजीचा आनंद
view commentsपर्यावरणप्रेमी, पोलीस आणि वनविभागाकडून नाशिककरांना आवाहन करण्यात आले आहे की, नागरिकांनी नायलॉन किंवा चायनीज मांजाचा वापर पूर्णपणे टाळावा. साध्या दोऱ्यानेही पतंग उडवण्याचा आणि पतंगबाजीचा आनंद सुरक्षितपणे घेता येऊ शकतो.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
December 16, 2025 12:41 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
सावधान! मुलांची चूक पालकांना भोवणार, नुसती तुरुंगवारी नाही, आता ‘मोक्का’ लागणार










