नाशिक - भारताची 'वाईन कॅपिटल' म्हणून नाशिकची ओळख आहे. हे शहर गोदावरी नदीच्या काठी वसलेलं असून, इथे धार्मिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक गोष्टींचा संगम बघायला मिळतो. कुंभमेळ्यासाठी हे एक प्रमुख तीर्थस्थळ मानलं जातं.
'ठाकरे ब्रँड'ची अजून सुरवात नाही झाली, सुरवात झाल्यावर बघा काय होत,अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला आहे.
नाशिक शहरापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर ओझर विमानतळ आहे. येथून मुख्यतः मुंबई, पुणे आणि दिल्लीसाठी विमानसेवा उपलब्ध आहे. जास्त पर्याय हवे असतील, तर प्रवासी मुंबई विमानतळाचा (१७० किमी दूर) वापर करतात.
शहरात फिरण्यासाठी शहर बस, शेअर जीप, रिक्षा आणि ॲप-आधारित टॅक्सी (ओला, उबर) उपलब्ध आहेत.
नाशिक रोड रेल्वे स्टेशन मुंबई-दिल्ली रेल्वे मार्गावर आहे. मुंबई/पुण्याहून 'पंचवटी एक्सप्रेस' आणि 'गोदावरी एक्सप्रेस' सारख्या गाड्या इथे नेहमी येतात. तसेच, दिल्ली आणि इतर महानगरांहून येणाऱ्या 'राजधानी एक्सप्रेस' आणि इतर लांब पल्ल्याच्या गाड्याही इथे थांबतात.
नाशिक शहर NH 160 (मुंबई-नाशिक महामार्ग) आणि NH 848 ने जोडलेलं आहे. मुंबईहून ते १६५ किमी (३-४ तास) आणि पुण्याहून २१० किमी दूर आहे. राज्य परिवहन मंडळाच्या बसेस, खासगी बस आणि शेअर टॅक्सी नियमितपणे धावतात.
नाशिकनाशिक