चिपळूणमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वबळाचा नारा, महायुतीत ठिणगी

Last Updated:

चिपळूणमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वबळावर निवडणूक लढवण्याचा ठाम निर्धार करण्यात आला आहे.

अजित पवार आणि शेखर निकम
अजित पवार आणि शेखर निकम
राजेश जाधव, प्रतिनिधी रत्नागिरी, चिपळूण : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मित्रपक्षांमध्ये महायुतीबाबत चर्चा सुरू असली तरी युती झाली नाही, तर चिपळूण राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वबळावर निवडणूक लढवण्याचा ठाम निर्धार करण्यात आला आहे.
घेतलेल्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या ९ गटांमध्ये आणि पंचायत समितीच्या १८ गणांमध्ये पक्ष आपले उमेदवार उतरवणार आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय आमदार शेखर निकम यांच्या अध्यक्षतेखाली सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
सावर्डे येथील बैठकीत महायुतीमधील यांच्यातील अपेक्षित युती आणि वाटाघाटी निष्फळ ठरल्या तर ,दोन्ही निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी ठेवली जाईल. मात्र वरिष्ठ नेते आणि पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो सर्वांनी मान्य करू, असा ठरावही एकमुखाने मांडण्यात आला.
advertisement
राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम म्हणाले, महायुतीच्या माध्यमातून आपण तालुक्यात सर्व स्तरांवर विकासकामे केली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तिघांनी मिळून कोकणासह संपूर्ण राज्यात जलदगतीने विकास घडवून आणला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आत्मविश्वास ठेवावा. वरिष्ठ स्तरावरून महायुतीबाबत सकारात्मक संकेत मिळाले आहेत आणि त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चिपळूणमध्ये कोणत्याही कारणास्तव युती न झाल्यास अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढेल, असे स्पष्टपणे शेखर निकम यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
चिपळूणमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वबळाचा नारा, महायुतीत ठिणगी
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement