Ajit Pawar : शरद पवारांचे निवृत्तीचे संकेत, अजितदादा म्हणतात, मी याबद्दल खूप मोठी किंमत मोजलीय

Last Updated:

Ajit Pawar On Sharad Pawar : शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले असून याबाबत प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी म्हटलं की, मी याबद्दल खूप मोठी किंमत मोजलीय.

News18
News18
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत प्रचार सभेत बोलताना राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिलीय. अजित पवार यांनी न्यूज १८ लोकमतला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, मी यावर बोललो तेव्हा खूप मोठी किंमत मोजली आहे. महाराष्ट्रातील जनतेनं तेव्हा मला व्हिलन ठरवलं.
अजित पवार यांनी म्हटलं की, निवृत्तीचे संकेत दिलेत, मी याची मोठी किंमत चुकवली आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं मला व्हिलन ठरवलं होतं. अशा प्रकारचा प्रसंग यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेला होता. ते सगळं जाहीर केल्यानंतर दोन ते तीन दिवसातच त्यांनी तो निर्णय फिरवला. कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर असं ते म्हणाले होते.
उद्याला शरद पवार यांच्या मनात नक्की काय आहे हे महाराष्ट्रातल्या कोणालाही आजपर्यंत कळलं नाही. अगदी मी घरातला असलो तरीही घरातल्या व्यक्तीलासुद्धा कळलेलं नाही असं उत्तर अजित पवार यांनी दिलं.
advertisement
काय म्हणाले शरद पवार?
मी १४ निवडणुका लढलो आणि त्यात विजयी झालो. अजून दीड वर्षे मी राज्यसभेचा खासदार असणार आहे. मुदत संपली की पुन्हा राज्यसभेवर जायचं की नाही याचा विचार करावा लागेल. मी लोकसभा लढणार नाही. आता किती निवडणुका लढवायच्या. त्यामुळे आता थांबले पाहिजे असं शरद पवार मंगळवारी बारामतीत बोलताना म्हणाले.
advertisement
दीड वर्षांपूर्वी घोषणेनंतर राजकीय उलथापालथ
दीड वर्षापूर्वी शरद पवार यांनी लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशनावेळी निवृत्तीची घोषणा केली होती. पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याचं ते म्हणाले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत शरद पवार यांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली होती. तेव्हा अजित पवार यांनी शरद पवार यांच्या निवृत्तीचा निर्णय योग्य असल्याची भूमिका घेतली होती. त्यावरून त्यांच्यावर टीकाही झाली. त्यानंतरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अजित पवार हे महायुतीत सहभागी झाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ajit Pawar : शरद पवारांचे निवृत्तीचे संकेत, अजितदादा म्हणतात, मी याबद्दल खूप मोठी किंमत मोजलीय
Next Article
advertisement
Raigad News: २३ वर्षांच्या पोरीने लाल बावटा फडकावला, शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक्ष
शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक
  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

  • शेकापच्या गडात भाजपचा दारूण पराभव, २३ वर्षांची अक्षया नाईक सर्वांत तरुण नगराध्यक

View All
advertisement