राष्ट्रवादीने उद्याच सगळ्या आमदारांची बैठक बोलावली, मुंबईत घडामोडी वाढल्या, वहिनींसाठी नेत्यांचा जोर
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्षपद कुणाकडे आणि राज्याचे उपमुख्यमंत्रिपद कुणाकडे द्यायचे? असा प्रश्न राष्ट्रवादीसमोर आहे.
मुंबई : अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाची धुरा देण्यात यावी तसेच उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारीही देण्यात यावी, असा पक्षातल्या नेत्यांचा मतप्रवाह असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उद्याच (शनिवारी) आमदारांची बैठक बोलावली आहे. पक्षाच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या आमदारांनी शनिवारी पक्ष कार्यालयात यावे, असा निरोप पक्षाच्या वतीने धाडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावून सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली जाईल आणि त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद दिले जाईल, अशी शक्यता पक्षातील सूत्रांनी व्यक्त केली. आमदारांच्या बैठकीनंतर पक्षातील वरिष्ठ नेते सुनेत्रा पवार यांची भेट घेण्याकरिता बारामतीला रवाना होतील, असेही कळते.
पक्षाची बैठक, आमदारांशी चर्चा होणार
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्षपद कुणाकडे आणि राज्याचे उपमुख्यमंत्रिपद कुणाकडे द्यायचे? असा प्रश्न राष्ट्रवादीसमोर आहे. या दोन पदांवर नियुक्त्यासंदर्भात उद्याच्या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित असून त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते सुनेत्रा पवार यांना भेटण्यासाठी बारामतीला जाणार आहेत.
advertisement
सुनेत्रा पवारांविषयी आमची मुख्यमंत्र्यांसोबत कोणतीही चर्चा झाली नाही
सुनेत्रा पवार यांना घेऊन कोणतीही चर्चा मुख्यमंत्री यांच्यासोबत झाली नाही. आम्ही वेगळ्या कामासाठी गेलो होतो. अंतिम निर्णयासाठी अजून दोन तीन दिवस लागतील. उद्या आम्ही बारामतीला जाऊन सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहोत, असे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
सुनेत्रा पवार यांच्या नावावरच बैठकीत चर्चा- छगन भुजबळ
advertisement
सुनेत्रा पवार यांनाच विधिमंडळ नेता करावे, यासंदर्भाने आज पक्षाच्या नेत्यांनी चर्चा केली. उद्या सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी माध्यमांना सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 30, 2026 5:11 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राष्ट्रवादीने उद्याच सगळ्या आमदारांची बैठक बोलावली, मुंबईत घडामोडी वाढल्या, वहिनींसाठी नेत्यांचा जोर










