Budget 2024 : घालीन लोटांगण वंदीन बिहार, डोळ्यांनी पाहीन आंध्र माझे, सरकार वाचवेन...; कोल्हेंची टीका

Last Updated:

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अमोल कोल्हे यांनी अर्थसंकल्पावर टीका करताना 'घालीन लोटांगण वंदीन चरण' आरतीचे विडंबन केलंय.

News18
News18
मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर आता विरोधकांकडून टीका केली जात आहे. एनडीएतील मित्र पक्षांना खूश करण्यासाठी आणि सरकार वाचवण्यासाठी हा अर्थसंकल्प असल्याचं विरोधकांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अमोल कोल्हे यांनी अर्थसंकल्पावर टीका करताना घालीन लोटांगण वंदीन चरण याचे विडंबन केलंय. घालीन लोटांगण वंदीन बिहार, डोळ्यांनी पाहीन आंध्र माझे, दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र, सरकार वाचवेन म्हणे नमो अशा शब्दात अमोल कोल्हे यांनी निशाणा साधला आहे.
अर्थसंकल्पात बिहारला मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आलीय. बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही पूर्वोदय योजना तयार केली जाणार आहे. बिहारमध्ये वेगवेगळ्या योजनांसाठी ५८ हजार ९०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. यातील २६ हजार कोटी महामार्गांसाठी असणार आहेत. राज्यात तीन एक्सप्रेस वेसुद्धा तयार केले जातील. याशिवाय आंध्र प्रदेशसाठीही अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत.
advertisement
सरकार वाचवण्याची केविलवाणी धडपड आहे. जेडीयू टीडीपीच्या मागण्या पूर्ण करून खैरात बिहार आणि आंध्र प्रदेशला देण्याचा प्रयत्न आहे. त्यांना निधी दिला त्याचं वाईट वाटण्याचं कारण नाही. पण जो महाराष्ट्र जो सर्वाधिक महसूल देतो त्या महाराष्ट्राच्या वाट्याला तोंडाला पानं पुसली आहेत अशा शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी टीका केली.
advertisement
ट्रिपल इंजिनचं सरकार महाराष्ट्रात आहे, दिल्ली वाऱ्या करतं ते सध्या काय करतंय. ट्रिपल इंजिन सरकारची या सरकारमध्ये भूमिका आहे असं एनडीए सरकारला वाटत नाही का?  वाटत असेल तर महाराष्ट्राच्या वाट्याला असं घसघशीत भरघोस दान का पडलं नाही याचं उत्तर महाराष्ट्रातल्या महायुतीच्या नेत्यांनी द्यायला हवं, एकूणच महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणावर निराशा करणारा हा अर्थसंकल्प आहे असंच म्हणावं लागेल असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Budget 2024 : घालीन लोटांगण वंदीन बिहार, डोळ्यांनी पाहीन आंध्र माझे, सरकार वाचवेन...; कोल्हेंची टीका
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement