Nevasa Vidhan sabha: नेवाशात सेना विरुद्ध सेना! लोकसभेप्रमाणे शिर्डी पॅटर्न दिसणार की महायुती जागा खेचणार?

Last Updated:

Maharashtra Assembly Election 2024 Nevasa Assembly Constituency : गेल्या निवडणुकीत क्रांतिकारी शेतकरी पक्ष नावाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवणारे माजी मंत्री शंकरराव गडाख पुन्हा आमदार झाले होते. गडाख यांना या वेळी महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवार म्हणून तिकिट दिलं आहे.

Nevasa Assembly Constituency Election Result
Nevasa Assembly Constituency Election Result
नेवासा, अहिल्यानगर :  अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यात येणाऱ्या 12 मतदारसंघांपैकी एक आहे नेवासे किंवा नेवासा. नेवासा विधानसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे. प्रवरा नदीकाठी वसलेल्या नेवासे तालुका या विधानसभा मतदारसंघात येतो. ज्ञानेश्वरीचं गावं म्हणून प्रसिद्ध असलेल्या नेवाशात गेल्या निवडणुकीत क्रांतिकारी शेतकरी पक्ष नावाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवणारे माजी मंत्रीशंकरराव गडाख पुन्हा आमदार झाले होते. गडाख यांना या वेळी महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवार म्हणून तिकिट दिलं आहे. ते शिवसेना (उबाठा) पक्षातर्फे मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.
महायुतीमध्येही नेवाशाच्या जागेवरून बरीच चर्चा झाली. अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला हा मतदारसंघ मिळाला. पण त्यांच्याकडे गडाख यांच्या तोडीस तोड उमेदवारच मिळत नव्हता. इच्छुक अनेक होते. भाजपलाही ही जागा हवी होती. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी जोर लावला होता. पण अखेर भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी ऐन वेळी भाजपच्या पदाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला आणि निवडणुकीच्या रिंगणात महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून उतरले. पण मुरकुटे निवडणूक लढण्यावर ठाम राहिले. त्यांनी बच्चू कडू यांच्या जनशक्ती प्रहार पक्षाकडून उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे नेवासा मतदारसंघात तिरंगी लढत होऊ शकते.
advertisement

नेवासा विधानसभा मतदारसंघ इतिहास

लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, 2008 नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, नेवासा मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्याचा समावेश होतो. 2009 पूर्वी हा मतदारसंघ अस्तित्वात नव्हता. पश्चिम महाराष्ट्राच्या या भागात होतं तसं राष्ट्रवादीचं वर्चस्व इथे होतं. 2009 ची निवडणूक शंकरराव गडाख यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावरच लढवली होती आणि ते आमदार झाले होते. 2017 मध्ये त्यांनी क्रांतीकारी शेतकरी पक्ष स्थापन केला आणि 2019 ची निवडणूक याच पक्षाच्या नावाने लढवली. पक्ष नोंदणी बाकी असल्याने ते अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सरकारला त्यांनीच पाठिंबा दिला होता. 2020 मध्ये त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत आपला क्रांतिकारी शेतकरी पक्ष विलीन केला. आता 2024 ची निवडणूक ते शिवसेना (उबाठा) पक्षाकडूनच लढवत आहेत.
advertisement
भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे पाटील यांचा नेवाशात चांगला जनसंपर्क आहे. आता त्यांना शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या पाठी भाजपची ताकद आणि आता शिंदे शिवसेनेचं बळही मिळेल. भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी बंडखोरी करत अर्ज भरल्याने निवडणुकीत रंग भरला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत नेवासा मतदारसंघात क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाख यांनी भाजपच्या बाळासाहेब मुरकुटे यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत शंकरराव गडाख यांना 1 लाख 16 हजार 943 मतं पडली होती. तर बाळासाहेब मुरकुटे यांना 86 हजार 280 मतं पडली होती.
advertisement

2019 विधानसभा नेवासा मतदारसंघ निकाल

शंकरराव गडाख – अपक्ष – 1,16,943
बाळासाहेब मुरकुटे – भाजप - 86 280

2024 लोकसभा निवडणुकीला काय झालं?

नेवाशाची विधानसभेची जागा लोकसभेच्या शिर्डी मतदारसंघात येते. शिर्डीत 2024 लोकसभा निवडणुकीला सेना विरुद्ध सेना असा थेट सामना झाला होता. भाऊसाहेब वाकचौरे यांना शिवसेना उबाठा पक्षातर्फे तिकिट मिळालं होतं. तर माजी खासदार सदाशिव लोखंडे शिंदेंच्या गोटात होतं. महायुतीने शिवसेनेतर्फे त्यांनाच पुन्हा तिकिट दिलं होतं. सदाशिव लोखंडे 2014 आणि 2019 दोन्ही निवडणुका शिवसेनेतर्फे जिंकल्या होत्या. पण एकनाथ शिंदे महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडल्यावर लोखंडे यांनी शिंदेंना साथ दिली होती. या लोखंडेंचा 4000 मतांनी शिर्डीतून पराभव झाला. नेवासा मतदार संघातून लोखंडे पिछाडीवर होते. त्यामुळे भाजप-सेना महायुतीला नेवाशात जोर लावावा लागणार आहे.
advertisement

अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांचं सध्याचं बलाबल

राज्यातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 12 मतदारसंघ आहेत.
1. अकोले - किरण लहामटे (राष्ट्रवादी)
2. संगमनेर - बाळासाहेब थोरात (काँग्रेस)
3. शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील (भाजप)
4. कोपरगाव - आशुतोष काळे (राष्ट्रवादी)
5. श्रीरामपूर - लहू कानडे (काँग्रेस)
advertisement
6. नेवासा- शंकरराव गडाख (अपक्ष) आता शिवसेना (उबाठा)
7. शेवगाव पाथर्डी - मोनिका राजळे (भाजप)
8. राहुरी - प्राजक्ता तनपुरे (राष्ट्रवादी)
9. पारनेर - निलेश लंके (राष्ट्रवादी) सध्या रिक्त
10. अहमदनगर शहर - संग्राम जगताप (राष्ट्रवादी)
11. श्रीगोंदा- बबनराव पाचपुते (भाजप)
12. कर्जत जामखेड - रोहित पवार (राष्ट्रवादी)
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nevasa Vidhan sabha: नेवाशात सेना विरुद्ध सेना! लोकसभेप्रमाणे शिर्डी पॅटर्न दिसणार की महायुती जागा खेचणार?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement