ONGC Vacancy 2025: न परीक्षा देताच मिळणार सरकारी नोकरी, ONGC कंपनीत जम्बो भरती; लवकरच करा अर्ज
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
ONGC Apprentice Recruitment 2025: नोकरीच्या शोधात असणार्या उमेदवारांसाठी भारत सरकारच्या मोठ्या कंपनीमध्ये चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भारत सरकारच्या ऑइल ॲण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन या कंपनीकडून तब्बल 2700 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
नोकरीच्या शोधात असणार्या उमेदवारांसाठी भारत सरकारच्या मोठ्या कंपनीमध्ये चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भारत सरकारच्या तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ लिमिटेड (ऑइल ॲण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन- ONGC) कडून तब्बल 2700 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. कंपनीकडून विविध ट्रेड्स आणि विभागांमध्ये अप्रेंटिस ट्रेनिंगसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 108 पदांवर भरती जाणार आहे. ही भरती प्रक्रिया नुकतीच सुरू झाली असून लवकरात लवकर इच्छूक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
भारत सरकारच्या ऑइल ॲण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन कंपनीमध्ये लायब्ररी असिस्टंट, फायर सेफ्टी टेक्निशियन, लॅब केमिस्ट किंवा ॲनालिस्ट (पेट्रोलियम प्रॉडक्ट्स), अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह, कॉम्प्युटर सायन्स एक्झिक्युटिव्ह, HR एक्झिक्युटिव्ह, COPA (कंप्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट), इलेक्ट्रिशियन, फिटर, ड्राफ्ट्समन (सिव्हिल) किंवा इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक अशा पदांवर अप्रेंटिसशिप पदासाठी भरती केली जाणार आहे. 2743 पदांसाठी भरती होणार आहे. कंपनीकडून विविध ट्रेड्स आणि विभागांमध्ये अप्रेन्टिस ट्रेनिंगसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. फ्रेशर्स उमेदवार ही अप्रेन्टिसशिपची ट्रेनिंग पूर्ण करून अनुभव प्राप्त करू शकतात. तसेच, ट्रेनिंगच्या कालावधीत उमेदवारांना स्टायपेंड देखील दिलं जाईल.
advertisement
भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवार 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण असावा त्यासोबतच त्यांच्याकडे संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय/ बी.कॉम/ बीएससी/ बीबीए/ ग्रेजुएट/ डिप्लोमा/ बीई/ बीटेक इंजीनियरिंगचीही डिग्री असणं गरजेचं आहे. भरतीसाठी अर्ज करण्यासाठी किमान 18 वर्षे आणि कमाल 24 वर्षे अशी उमेदवारांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. तसेच, 6 नोव्हेंबर 2025 ही तारीख लक्षात घेऊनच उमेदवारांच्या वयाची गणना केली जाईल. म्हणजेच या भरतीमध्ये 06 नोव्हेंबर 2001 ते 06 नोव्हेंबर 2007 यादरम्यान जन्मतारीख असलेले उमेदवार सहभागी होऊ शकतात.
advertisement
ओएनजीसीमधील (ONGC) भरती मोहिम 16 ऑक्टोबरपासून सुरू झाली असून नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 नोव्हेंबर 2025 आहे. तुमच्याकडे अर्ज करण्यासाठी अजून 20 दिवस आहेत. या भरती प्रक्रियेत उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. निवड प्रामुख्याने उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेमध्ये मिळवलेल्या गुणांवर आधारित 'गुणवत्ता यादी' आणि त्यानंतर मुलाखती द्वारे त्यांची निवड केली जाणार आहे. 'गुणवत्ता यादी' येत्या 26 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर केला जाईल. ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी उमेदवारांना 12,300 रुपये पगार मिळणार आहे. डिप्लोमा केलेल्या उमेदवारांना 10,900 रुपये, ट्रेड अप्रेंटिस पदासाठी 8200- 10560 रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यायची नाहीये. तुम्हाला मिळालेल्या गुणांच्या आधारे तुमची निवड केली जाणार आहे.
advertisement
अर्ज कसा करावा?
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ओएनजीसीच्या nats.education.gov.in किंवा www.apprenticeshipindia.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- मुखपृष्ठावरील भरती विभागात क्लिक करा.
- आता "ऑनलाइन अर्ज करा" वर क्लिक करा.
- फॉर्मवर आवश्यक माहिती भरा.
- आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
- तुमच्या श्रेणीनुसार शुल्क भरा.
- अर्ज भरल्यानंतर, ते सबमिट करा.
- शेवटी, फॉर्म तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा किंवा प्रिंट काढून ठेवा.
advertisement
Location :
Maharashtra
First Published :
October 21, 2025 8:42 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ONGC Vacancy 2025: न परीक्षा देताच मिळणार सरकारी नोकरी, ONGC कंपनीत जम्बो भरती; लवकरच करा अर्ज