लग्नाला चाललेलं जोडपं हायवेवरून रहस्यमयरित्या गायब, फोन बंद, कारही गायब, घातपाताचा संशय

Last Updated:

जळगाव जिल्ह्यातील एका लग्न सोहळ्यासाठी खासगी कारने निघालेले एक दाम्पत्य बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते मलकापूरदरम्यान महामार्गावर रहस्यमयरीत्या गायब झालं आहे.

News18
News18
राहुल खंडारे, प्रतिनिधी बुलढाणा: तेलंगणा राज्यातून जळगाव जिल्ह्यातील एका लग्न सोहळ्यासाठी खासगी कारने निघालेले एक दाम्पत्य बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते मलकापूरदरम्यान महामार्गावर रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. या बेपत्ता घटनेमुळे परिसरात घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.
पद्मसिंह दामू पाटील (राजपूत) हे त्यांची पत्नी नम्रता पाटील असं या दाम्पत्याचं नाव असून त्यांच्या कारचा क्रमांक MH 13 BN 8583 आहे. ते या कारने जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील लग्नासाठी निघाले होते. पाटील हे तेलंगणा राज्यातील सीतापूरम येथील एका खासगी सिमेंट कंपनीत कार्यरत आहेत.

शेवटचं लोकेशन वडनेर भोलजीजवळ

मिळालेल्या माहितीनुसार, या दाम्पत्याने २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजता आपल्या नातेवाइकांशी शेवटचा फोनवर संवाद साधला होता. नातेवाईक जळगावला पोहोचले, मात्र पाटील दाम्पत्य निर्धारित वेळेत पोहोचले नाही. वारंवार फोन करूनही दोघांचेही मोबाइल स्विच ऑफ येत असल्याने नातेवाइकांचा संशय वाढला.
advertisement
तपासात, दाम्पत्याच्या मोबाइलचे शेवटचे लोकेशन बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ते मलकापूरदरम्यान महामार्गावर असलेल्या वडनेर भोलजी (ता. नांदुरा) गावाजवळ आढळून आले. तसेच, त्यांची कार २७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७:११ वाजता बाळापूरजवळील तरोडा टोल नाका ओलांडताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसली होती. मात्र, वडनेर भोलजीनंतर या दाम्पत्याचा कोणताही मागमूस लागला नाही.

घातपाताचा संशय आणि पोलिसांचा तपास

advertisement
दाम्पत्याच्या अचानक बेपत्ता होण्यामुळे त्यांचे नातेवाईक संदीप रमेश पाटील यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. विशेष म्हणजे, महामार्गावर कोठेही त्यांच्या गाडीचा अपघात नोंदवलेला नसल्याने या घटनेमागे घातपाताचा तीव्र संशय व्यक्त केला जात आहे.
नांदुरा पोलीस ठाण्याचे पीआय जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. २८ नोव्हेंबरपासून पोलिसांनी दोन स्वतंत्र पथके तयार करून नांदुरा-मलकापूरदरम्यानच्या महामार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी सुरू केली आहे. तसेच, सोशल मीडियावरही या बेपत्ता दाम्पत्याची माहिती मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आली आहे. पोलिसांचे पथक या दाम्पत्याच्या शोधासाठी कसून प्रयत्न करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लग्नाला चाललेलं जोडपं हायवेवरून रहस्यमयरित्या गायब, फोन बंद, कारही गायब, घातपाताचा संशय
Next Article
advertisement
Nanded Crime News : 'तुझं लग्न लावून देतो',  आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...
  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

  • 'तुझं लग्न लावून देतो', आंचलसमोर वडिलांनी ठेवली होती एक अट, अन् तिथंच...

View All
advertisement