Pandharpur : पंढरपूर हादरलं, घरामध्ये घुसून आई अन् मुलावर सपासप वार, दोघंही जागीच ठार
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आई आणि मुलाची घरात घुसून हत्या झाल्यामुळे पंढरपूरमध्ये खळबळ माजली आहे. पंढरपूरच्या कुंभार गल्लीमध्ये रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास आई आणि मुलाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे.
विरेंद्रसिंह उत्पात, प्रतिनिधी
पंढरपूर : आई आणि मुलाची घरात घुसून हत्या झाल्यामुळे पंढरपूरमध्ये खळबळ माजली आहे. पंढरपूरच्या कुंभार गल्लीमध्ये रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास आई आणि मुलाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. कुंभार गल्लीत राहणाऱ्या लखन जगताप आणि त्यांची आई सुरेखा जगताप यांना त्यांच्याच घरात घुसून धारदार शस्त्राने मारण्यात आले.
हल्लेखोराने लखनच्या पाठीवर आणि डोक्यावर वार केले तर सुरेखा जगताप यांच्या मानेवर आणि डोक्यावर वार करून त्यांना मारण्यात आलं आहे. लखन आणि सुरेखा जगताप यांची हत्या नक्की कुणी केली? कुठल्या कारणावरून त्यांची हत्या झाली? याबाबत कुठलीच ठोस माहिती समोर आलेली नाही. हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवायला सुरूवात केली आहे.
advertisement
लखन आणि सुरेखा यांच्यावर हल्ला करणारा फक्त एक जण होता का हल्लेखोरांची संख्या आणखी होती? याचा तपासही पोलीस करत आहेत. रात्री 9.30 च्या सुमारास लखन आणि सुरेखा यांच्यावर त्यांच्याच घरात धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला, यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केलं. दरम्यान पंढरपूर पोलीस लखन आणि सुरेखा यांचे नातेवाईक आणि त्यांच्या शेजाऱ्यांची चौकशी करत आहेत.
Location :
Pandharpur,Solapur,Maharashtra
First Published :
July 15, 2025 11:42 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Pandharpur : पंढरपूर हादरलं, घरामध्ये घुसून आई अन् मुलावर सपासप वार, दोघंही जागीच ठार