आषाढी एकादशी आधी पंढरपूर मंदिर प्रशासनाचा सर्वात मोठा निर्णय, आता दर्शन लगेच होणार

Last Updated:

Pandharpur Vitthal Mandir: मागील काही दिवसांपासून वशिल्याच्या दर्शनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. यामुळे दर्शन रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना तासन्तास ताटकळत थांबावे लागत होते.

विठ्ठल मंदिर पंढरपूर प्रशासन
विठ्ठल मंदिर पंढरपूर प्रशासन
पंढरपूर (सोलापूर) : आषाढी वारीची जोरदार तयारी सुरू असताना आणि सध्या मंदिरात होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाढती संख्या विचारात घेता मंदिर प्रशासनाने व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात मंदिर समितीने एक परिपत्रक देखील प्रसिद्ध केले आहे.

वशिल्याचे दर्शन बंद करण्याचा निर्णय

मागील काही दिवसांपासून वशिल्याच्या दर्शनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. यामुळे दर्शन रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना तासन्तास ताटकळत थांबावे लागत असल्याचा प्रकार घडत आहे. यावर आता मंदिर समितीने वशिल्याचे दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष सदस्य आणि कार्यकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय यापुढे कोणालाही मंदिरात दर्शनासाठी सोडले जाणार नाही असा लेखी आदेश कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढला आहे.
advertisement
आषाढी यात्रेच्या निमित्ताने आत्तापासूनच पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. येणाऱ्या भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे वेळेत आणि सुलभ दर्शन व्हावे यासाठी वशिल्याचे दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंदिर प्रशासनाने काढलेल्या आदेशात काय म्हटलंय?

श्री विठ्ठल रूक्मिणीमातेच्या दर्शनरांगेत मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत आहे. त्यामुळे दर्शनरांगेतील भाविकांचे जलद व सुलभ दर्शन होण्याच्या दृष्टीने मंदिर समितीचे सन्माननीय सह अध्यक्ष, सदस्य, कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापक यांच्या आदेशाशिवाय कोणत्याही व्यक्तीस थेट दर्शनाचा लाभ देऊ नये. तसेच मंदिर समितीच्या कोणत्याही कर्मचा-यांना विना परवाना कोणत्याही व्यक्तीस थेट दर्शनासाठी मंदिरात प्रवेश देता येणार नाही. अन्यथा, आपल्यावर कर्मचारी सेवा विनियम, २०२५ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्याची येईल याची नोंद घ्यावी.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
आषाढी एकादशी आधी पंढरपूर मंदिर प्रशासनाचा सर्वात मोठा निर्णय, आता दर्शन लगेच होणार
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement