'कामासाठी इथे आले पण...', मुंबईत राहण्याबद्दल स्पष्टच बोलली रिंकु राजगुरू, म्हणते 'एकटेपणा जाणवला की...'

Last Updated:
Rinku Rajguru : सततच्या कामामुळे रिंकू सध्या मुंबईतच राहते. पण, मूळची अकलूजची असलेल्या या अभिनेत्रीला मुंबईतील जीवन कसं वाटतं, याबद्दल तिने एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
1/7
मुंबई: ‘सैराट’ या पहिल्याच चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू आता फक्त ‘आर्ची’ राहिलेली नाही. कमी वयातच तिने मराठीसह हिंदी चित्रपट आणि वेबविश्वातही आपलं नाव कमावलं आहे.

advertisement
2/7
तिची सध्याची ‘बेटर हाफची लव्ह स्टोरी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, तर लवकरच ती ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

3/7
सततच्या कामामुळे रिंकू सध्या मुंबईतच राहते. पण, मूळची अकलूजची असलेल्या या अभिनेत्रीला मुंबईतील जीवन कसं वाटतं, याबद्दल तिने एका मुलाखतीत खूपच भावनिक खुलासा केला आहे.

4/7
एका मुलाखतीत रिंकूला विचारण्यात आलं की, ती मुंबईतील आयुष्य कसं एन्जॉय करते? यावर रिंकू म्हणाली, “मुंबई छान आहे, वेगळी आहे. मी इथे फक्त कामासाठी आले आहे. पण, माझं मन अजूनही गावाकडेच ओढलं जातं.”

5/7
ती म्हणाली की, तिला तिथे राहायला जास्त आवडतं, कारण तिचं कुटुंब तिथे आहे. मुंबई ही कामासाठी एक चांगली जागा आहे, इथे अनेक सोयीसुविधा आहेत आणि बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळतात, असंही तिने सांगितलं. पण, ती फक्त ‘काम ते घर आणि घर ते काम’ अशीच असते.

6/7
मुंबईत कुटुंबाला वेळ देता येत नसल्यामुळे रिंकूला एकटेपणा जाणवतो. ती म्हणाली, “मुंबईत माझं कुटुंब नाही, त्यामुळे मला जेव्हा काम नसतं, करमत नसतं किंवा एकटं वाटतं, तेव्हा मी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बसते. कारण माहीत नाही, पण मला ते मंदिर खूप आवडतं.”

7/7
रिंकूने सांगितलं की, तिचे आई-वडील दोघेही शिक्षक आहेत, त्यामुळे त्यांना सतत मुंबईत येता येत नाही. सुट्टी असेल, तर ते येतात किंवा तीच थेट गावी जाते. याशिवाय, तिचे मुंबईत जास्त मित्र-मैत्रिणी नाहीत. मोकळ्या वेळेत ती तिच्या आई-वडिलांशी व्हिडिओ कॉलवर बोलते किंवा वाचन करते.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement