Parag Shah : राज्यातला सर्वात श्रीमंत उमेदवार भाजपचा, 2,187 कोटींची संपत्ती, 5 वर्षात 10 पट वाढ
- Published by:Suraj
Last Updated:
Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेला सर्वात श्रीमंत उमेदवार भाजपचा असून त्यांच्याकडे २ हजार कोटींची संपत्ती आहे.
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात २८८ जागांसाठी निवडणूक होत आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस मंगळवारी होता. शेवटच्या दिवसापर्यंत राज्यात २८८ जागांसाठी जवळपास ८ हजार जणांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्जात उमेदवार त्यांची संपत्ती, त्यांच्यावर असलेले गुन्हे याची माहिती प्रतिज्ञापत्रात देतात. राज्यात भाजपचे पराग शहा हे सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. पराग शहा यांना भाजपने घाटकोपर पूर्व मतदारसंघातून उमेदवारी दिलीय. पराग शहा यांची संपत्ती पाच वर्षात दहापट वाढलीय.
पराग शहा यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांची संपत्तीची माहिती प्रतिज्ञापत्रात दिलीय. त्यांच्याकडे २ हजार १७८ कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर पत्नीच्या नावावर १ हजार १३६ कोटी रुपयांची संपत्ती आहे. यामध्ये बहुतांश संपत्ती ही शेअर्स आणि गुंतवणूक स्वरुपात आहे. पराग शहा यांच्या नावावर ३१ कोटी किंमतीची मालमत्ता आहे तर पत्नीच्या नावे ३४.१७ कोटींची मालमत्ता आहे. पराग शहांवर एक लाखाचे तर पत्नीच्या नावावर ३६.९० लाखांचं कर्ज आहे.
advertisement
२०१९ च्या तुलनेत पराग शहा यांची संपत्ती दहा पट वाढलीय. २०१९ मध्ये त्यांची संपत्ती २३९ कोटी तर पत्नीची संपत्ती १६० कोटी इतकी होती. तर कौटुंबिक मालमत्ता २३ कोटी इतकी होती. पराग शहा यांची स्थावर मालमत्ता ३० कोटी आणि पत्नीकडे असलेली स्थावर मालमत्ता ३६.६४ कोटी रुपये किंमतीची होती.
पराग शहांनंतर श्रीमंत उमेदवारांमध्ये मंगल प्रभात लोढा यांचा नंबर लागतो. मलबार हिल मतदारसंघाचे आमदार असलेल्या आणि सध्या पर्यटन मंत्री असणाऱ्या मंगल प्रभात लोढा यांनी त्यांची संपत्ती ४३६ कोटी ८० लाख ५९१ इतकी असल्याचं सांगितलंय. यात जंगम मालमत्ता १२३ कोटी ३९ लाख रुपये इतकी आहे. तर स्थावर मालमत्ता १२५ कोटी ५४ लाख रुपयांची आहे. मंगल प्रभात लोढा यांच्यावर जवळपास १८२ कोटी रुपयांचे कर्ज आहे. शेअर्स, सोने यातील गुंतवणूक जवळपास ११ कोटी रुपये इतकी आहे. पाच वर्षांत त्यांच्या संपत्तीत घट झाल्याचं समोर आलंय. २०१९ च्या निवडणुकीत लोढा यांनी त्यांची संपत्ती ४४१ कोटींपेक्षा जास्त असल्याचं जाहीर केलं होतं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 30, 2024 10:17 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Parag Shah : राज्यातला सर्वात श्रीमंत उमेदवार भाजपचा, 2,187 कोटींची संपत्ती, 5 वर्षात 10 पट वाढ










