Honor Killing In Parbhani : प्रेमविवाहाला घरच्यांचा विरोध, जन्मदात्या बापानेच दाबला गळ अन्.. ऑनर किलिंगची Inside Story

Last Updated:

Honor Killing In Parbhani: परभणीमधील पालम तालुक्यात घडलेल्या एका घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे.

(प्रतिकात्मक फोटो)
(प्रतिकात्मक फोटो)
crपरभणी, (विशाल माने, प्रतिनिधी) : पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालणारी घटना परभणी जिल्ह्यातून समोर आली आहे. मुलीच्या आंतरजातीय विवाहला विरोध करत, आई-वडिलांनी आपल्या भावकीतील अन्य सहा जणांच्या सहाय्याने, तिचा खून करून मृतदेह जाळून पुरावा नष्ट केल्याची घटना घडली आहे. पालम तालुक्यात एका गावामध्ये ऑनर किलिंगचा हा प्रकार घडला आहे.
याप्रकरणी पालम पोलीस ठाण्यामध्ये आठ जणांच्या विरोधात खून करून, पुरावा नष्ट केल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीमा (नाव बदलेलं) असं 19 वर्षीय तरुणीचं नाव आहे. या प्रकरणी तिचे वडील, आई, आणि भावकीतील इतक नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत तरुणीचे गावातील दुसऱ्या जातीतील मुलासोबत प्रेम संबंध होते. त्यातून आंतरजातीय विवाह करू नये, असा घरातील मंडळींचा आग्रह होता. परंतु सीमा त्या मुलासोबत लग्न करण्यावर ठाम होती. त्यातून 21 एप्रिल रोजी पहाटेच्या दरम्यान तिचा खून करण्यात आला आणि त्याच रात्री कोणालाही माहिती होऊ नये, यासाठी भावकितील निवडक लोकांना सोबत घेऊन, स्मशानभूमीत जाळून पुरावा नष्ट करण्यात आला. या प्रकरणाची अनेक जणांना माहिती असताना देखील सर्वांनी गुप्तता पाळली. अखेर पोलिसांना कुणकुण लागल्यावर या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
advertisement
कशी फुटली गुन्ह्याला वाचा?
21 एप्रिलच्या रात्री दहाच्या दरम्यान आपल्या मुलीला आई वडील समजावून सांगत होते. तो मुलगा दुसऱ्या जातीतला आहे. आपली समाजात इज्जत जाईल. आम्हाला हा विवाह मान्य नाही तू तो विषय मनातून काढून टाक. मात्र, त्यानंतरही मुलीवर काहीच परिणाम झाला नाही. मुलगी आपल्या निर्णयावर ठाम होती. त्या मुलासोबतच लग्न करणार असल्याचे आपल्या आई-वडिलांना सांगत होती. या गोष्टीचा राग अनावर झाल्याने वडिलांनी मुलीचा गळा दाबून खून केला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/परभणी/
Honor Killing In Parbhani : प्रेमविवाहाला घरच्यांचा विरोध, जन्मदात्या बापानेच दाबला गळ अन्.. ऑनर किलिंगची Inside Story
Next Article
advertisement
BMC Election : बीएमसी निवडणुकीत उलथापालथ, वॉर्ड २२६ मध्ये गेम फिरला, नार्वेकरांना निवडणूक जड?  मनसेने खेळ बिघडवला
BMCमध्ये उलथापालथ,,वॉर्ड २२६ मध्ये मनसेने गेम फिरवला, नार्वेकरांना निवडणूक जड?
  • मुंबई महापालिका निवडणुकीत काही ठिकाणी चांगलीच उलथापालथ झाली आहे.

  • वॉर्ड क्रमांक २२६ मधील निवडणूक चांगलीच चर्चेत आली आहे.

  • राजकीय समीकरणे चांगलीच बदलली असून मनसेच्या एका डावाने सगळा खेळ बिघडला आहे.

View All
advertisement