Phaltan Doctor: लटकवलेल्या ओढणीसोबत सेल्फी, डॉक्टर तरूणीने प्रशांत बनकरला पाठवलेला शेवटचा मेसेज समोर

Last Updated:

डॉक्टर तरुणीने आत्महत्या करण्याआधी आरोपी घरमालक प्रशांत बनकर याला शेवटचा मेसेज केला होता.

Phaltan Suicide
Phaltan Suicide
सचिन जाधव, प्रतिनिधी
सातारा : फलटण येथील महिला डॉक्टरने आत्महत्या प्रकरणाने सध्या राज्यात नव्हे तर देशात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सध्या चौकशी सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी पीएसआय गोपाल बदणे आणि प्रशांत बनकर यांना अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना आता नवी माहिती समोर आली आहे. डॉक्टरने आत्महत्या करण्याअगोदर लटकवलेल्या ओढणीचा फोटो आरोपी प्रशांत बनकर याला पाठवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
advertisement
डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकर हे एकमेकांना ओळखत होते. काही कारणास्तव त्यांच्यात वाद झाल्याने प्रशांत तिला टाळू लागला होता. दोघांमध्ये अनेक कॉल झाले आहेत. व्हॉट्सअप मेसेजही आहेत, ते पोलिसांनी मिळवले आहेत.एवढच नाही तर आत्महत्या करण्याआधी डॉक्टर तरुणीने आरोपी घरमालक प्रशांत बनकर याला शेवटचा मेसेज केला होता, अशी माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली होती.
advertisement

शेवटचा मेसेज काय?

डॉक्टर तरुणी एका हॉटेलवर गेली आणि आत्महत्येपूर्वी प्रशांत बनकरला मेसेज पाठवला, मात्र त्याचा फोन त्या वेळी बंद होता. आत्महत्येपूर्वीच्या या मेसेजमधून अनेक महत्त्वपूर्ण बाबी समोर येण्याची शक्यता असल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले होते. हा शेवटचा मेसेज म्हणजे डॉक्टरने आत्महत्या करण्याआधी लटकवलेली ओढणीचा सेल्फी बनकरच्या मोबाईलवर पाठवल्याची सूत्रांची माहिती आहे.
advertisement

रुपाली चाकणकर यांनी काय म्हणाल्या? 

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकर यांच्यात फोटो काढण्यावरून किरकोळ वाद झाला होता. फोटो व्यवस्थित न आल्याने झालेल्या वादानंतर डॉक्टर घरातून बाहेर पडल्या आणि जवळच्या देवळात गेल्या. त्यानंतर बनकरच्या वडिलांनी त्यांची समजूत काढून त्यांना परत आणले.त्यानंतर तरूणी हॉटेलवर गेल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.
advertisement

समोर आलेल्या सीसीटीव्हीमध्ये काय?

पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती महिला डॉक्टर दिसत असून ती एकटीच आहे. ती हॉटेलमधील रुम क्रमांक ११४ मध्ये एकटीच गेली असल्याचेही दिसून आले आहे. रात्रीच्या सुमारास एकटीच या हॉटेलमध्ये कशी आली, नेमकं काय घडलं, या सगळ्याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांकडून आता या फुटेजच्या आधारे आणि इतर माहितीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करण्यात येत आहे. या व्हिडीओनंतर मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Phaltan Doctor: लटकवलेल्या ओढणीसोबत सेल्फी, डॉक्टर तरूणीने प्रशांत बनकरला पाठवलेला शेवटचा मेसेज समोर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement