पुणे सोलापूर रस्त्यावरील चौफुला येथे भीषण अपघात, चालकाचे नियंत्रण सुटले, एक जण जागीच गेला
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
दौंड तालुक्यातील चौफुला येथील अपघात सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील चौफुला याठिकाणी ट्रॅव्हल्स आणि चार चाकी वाहनाचा भीषण अपघात झाला.
सुमित सोनावणे, प्रतिनिधी, दौंड: दौंडच्या चौफुला येथील ट्रॅव्हल्स आणि चार चाकी वाहनाच्या भीषण अपघातात एक जण ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेचा तपास यवत पोलीस करीत आहेत.
दौंड तालुक्यातील चौफुला येथील अपघात सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील चौफुला याठिकाणी ट्रॅव्हल्स आणि चार चाकी वाहनाचा भीषण अपघात झाला. ट्रॅव्हल्स बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्सने दुभाजक (डिव्हायडर) ओलांडून दुसऱ्या वाहनाला धडक दिली.
या अपघातामध्ये एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ट्रॅव्हल्सने दुभाजक ओलांडल्याने पुण्याहून सोलापूरच्या रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांना अचानक ब्रेक मारावा लागला. त्याचवेळी झालेल्या धडकेत एक जण ठार झाला. या अपघाताचा तपास यवत पोलिसांकडून करण्यात येत आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
October 10, 2025 5:32 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पुणे सोलापूर रस्त्यावरील चौफुला येथे भीषण अपघात, चालकाचे नियंत्रण सुटले, एक जण जागीच गेला